एक ‘गंभीर’ उन्हात तर दुसरा ‘गंभीर’ AC त, कसला हा प्रचार, फोटो व्हायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नेते मंडळी प्रचारासाठी काय करतील याचा काही नेम नाही. परदेशी क्रिकेटपटूंना सोशल मीडियावरून प्रत्युत्तर देऊन प्रसिद्धीच्या झोतात आलेला आणि भजापाचा उमेदवार गौतम गंभीर सध्या नेटकऱ्यांकडून ट्रोल होत आहे. तसेच त्याच्यावर टीका होत आहे.

पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघात प्रचारावेळी गंभीरने त्याचा डुप्लिकेट गाडीवर उभा केला आणि स्वत: एसी कारमध्ये बसल्याचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. याच फोटोवरून त्याच्यावर ‘गंभीर’ टीका होत आहेत.पूर्व दिल्ली मतदारसंघामध्ये गंभीरच्या विरोधात उभ्या असलेल्या मार्लेना यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर असलेली पत्रक वाटण्यात आली. यामागे गौतम गंभीर असल्याच आरोप त्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन केला.

गंभीर एखाद्या सशक्त महिलेबाबत अशा प्रकारची पत्रकबाजी करत असेल. तर ते महिलांना काय सुरक्षा देणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी याप्रकरणाची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. तर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी गंभीरविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याच इशारा दिला.

 

या सगळ्या प्रकरणावरून गंभीर वर टीका होत असताना आता गंभीरच्या डुप्लीकेटची यामध्ये भर पडली आहे. गंभीरचा डुप्लीकेट गौतम गंभीरचा प्रचार करत आहे. डुप्लिकेट उन्हामध्ये गाडीत उभारून मतदारांना अभिवादन करत आहे. तर खरा गंभीर मात्र एसीमध्ये बसला आहे. हा प्रकार एका चाणाक्ष मतदाराने ओळखून या घटनेचा फोटो आणि व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर टाकला. हे फोटो आणि व्हिडीओ सशल मीडियावर अपलोड करताना मतदाराने नरेंद्र मोदींचा डुप्लिकेट चौकीदार अशी टीका केली आहे.