दुरंतो एक्सप्रेसवर दरोडा, प्रवाशांचे दागिने आणि पैशांवर डल्ला

नागपुर : पोलीसनामा ऑनलाईन

दुरंतो एक्सप्रेसवर जळगाव जवळील माहिजी स्टेशनवर उभा असताना दरोडा टाकला. काल (गुरूवारी) मध्यरात्री 2.30 च्या सुमारास ही घटना घडली असून यामध्ये अनेक प्रवाशांचे दागीने आणि पैसे चोरट्यांनी लंपास केले आहेत. या प्रकरणी नागपूरच्या एका महिलेने ईगतपूरी रेल्वे पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली असून , रेल्वे पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

[amazon_link asins=’B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d200fb99-8bf8-11e8-bd0f-e582ee8ae24a’]

जळगावकडून मुंबईच्या दिशेने जाणारी दुरांतो एक्सप्रेस मध्यरात्री 2.30 च्या सुमारास माहेजी स्टेशनजवळ उभी होती. त्याच वेळी दरोडेखोरांनी दरोडा टाकला. यात अनेक प्रवाशांच्या दागिने आणि पैशांवर डल्ला मारला. तसेच दोरोडेखोरांनी नागपूरच्या अनिता चिंचोरिया या महिलेची सोन्याची पोत लांबवली आहे. एक्सप्रेसमधील अन्य प्रवासी कल्याणला तक्रार देणार असल्याचे इगतपुरी पोलिसांनी सांगितले. म्हसावद पोलीसांनी या घटनेची पाहणी केली असून घटनेचा तपास भुसावळ रेल्वे पोलिसांकडे वर्ग केला जाणार आहे.