अखेर 9 ऑक्टोबरपासून दुरंतो अन् विदर्भ एक्सप्रेस धावणार

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन –  कोरोनाच्या प्रसारामुळे २४ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणजे रेल्वेगाड्या सुद्धा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र अनलॉक मध्ये काही रेल्वे गाड्या सुरु करण्यात येत आहे. मुंबई मध्य रेल्वे विभागातून नव्याने पाच गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये ९ ऑक्टोबरपासून गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस आणि नागपूर – मुंबई दुरंतो सुपरफास्ट ही गाडी रोज धावणार आहे. या बाबतची सूचना ६ ऑक्टोबर रोजी करण्यात आली आहे.

कोणत्या गाड्या आणि कधी धावणार :

नागपूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (गाडी क्रमांक ०२२९०) दुरंतो एक्स्प्रेस ही गाडी ९ ऑक्टोबर सीएसएमटी- गोंदिया (गाडी क्रमांक ०२१०५) ही ट्रेन ९ ऑक्टोबर गोंदिया- सीएसएमटी (गाडी क्रमांक ०२१०६) विदर्भ एक्स्प्रेस ही गाडी १० ऑक्टोबर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- नागपूर (गाडी क्रमांक ०२२८९) ही १० ऑक्टोबर या गाड्या दिलेल्या तारखेपासून रोज धावणार आहेत. या गाड्या सुरु झाल्यामुळे प्रवाशांना ये-जा करणे सोयीस्कर होणार आहे. पूर्वीच्याच रेल्वे स्थानकावर दुरंतो, विदर्भ एक्स्प्रेसला थांबा असणार आहे.प्रवाशांना आरक्षण तिकीट घेऊनच प्रवास करावा लागेल, अशी माहिती बडनेरा रेल्वे स्थानकाचे मुख्य खंड वाणिज्य निरीक्षक शरद सयाम यांच्याकडून देण्यात आली आहे. अहमदाबाद, मुंबईकडे ये-जा करण्यासाठी हावडा- मुंबई मेल, हावडा- अहमदाबाद एक्स्प्रेसदेखील आता रोज सुरु करण्यात येणार आहे.

सीएसएमटी- पुणे, सुरत एक्स्प्रेस सुरू

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते पुणे (गाडी क्रमांक ०२१२३), पुणे-सीएसएमटी (गाडी क्रमांक ०२१२४), सीएसएमटी- पुणे (०२०१५), पुणे- सीएसएमटी (गाडी क्रमांक ०२०१६), सीएसएमटी- सुरत (गाडी क्रमांक ०२११५), सुरत- सीएसएमटी (गाडी क्रमांक ०२११६) या सुपर फास्ट गाड्या ९ ऑक्टोबरपासून रोज चालू करण्यात येणार असून त्याचे वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे.