सिग्नल फेल करून अवघ्या २० मिनिटांत लुटली ट्रेन 

दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वेमार्गावरचे सिग्नल फेल करून जम्मू-दिल्ली दुरान्तो एक्स्प्रेसचे दोन डबे लुटल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे अवघ्या २० मिनिटांत हा सगळा प्रकार घडला. मात्र आजूबाजूच्या डब्यातील लोकांनाही याची कुणकुण लागली नाही. तसेच या ट्रेनमध्ये हजर असणाऱ्या सीआरपीएफच्या जवानांना या लुटीची साधी चाहुलही लागली नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जातं आहे.

आज पहाटे साडेतीन चारच्या सुमारास बादली-सराय रोहिल्ला स्टेशनदरम्यान दुरान्तो एक्स्प्रेसचे दोन डबे लुटल्याची घटना घडली. पहाटे ३ च्या सुमारास दुरान्तोने सोनीपत स्टेशन ओलांडले. बादली आऊटरला ट्रेनला हिरवा सिग्नल दाखवण्यात आला होता. पण लुटारूंनी सिग्नल फेल करून लाल सिग्नल दिला आणि भरधाव वेगाने येणारी दुरान्तो रोखली. त्यानंतर ५ ते १० लुटारू बी-३ आणि बी-०७ या डब्यांमध्ये शिरले. प्रवासी आवाज करणार नाहीत याची खबरदारी लुटारूंनी घेतली. प्रवाशांच्या मानेवर सुरा ठेवून त्यांच्याजवळचा लाखोंचा ऐवज लुटारूंनी हस्तगत केला. अवघ्या २० मिनिटांत लूट करून लुटारूंनी पळ काढला. घडलेला प्रकार आजूबाजूच्या डब्यातील लोकांना तसेच सीआरपीएफच्या जवानांनाही काळाला नाही.

सराय रोहिल्ला स्टेशनला पोहोचली तेव्हा सराय रोहिला स्टेशनवरील पोलिसांकडे या प्रकाराची तक्रार प्रवाशांनी केली. पोलिसांनी लुटीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us