ATM वापरतांना ‘ही’ काळजी घ्या, अन्यथा ….

पोलीसनामा ऑनलाईनः डिजिटल बँकिंगचा जमाना असला तरीही रोखीत व्यवहार करणाऱ्यांची संख्या अतिशय मोठी आहे. बँकेत जमा असलेली रोख रक्कम काढण्यासाठी एटीएमचा वापर करतात. एटीएमही बँकिंग प्रणाली सर्वात चांगली सुविधा असली तरी एटीएमधारकाच्या निष्काळजीपणा, अज्ञानामुळे एटीएमची सुविधा ग्राहकांसाठी धोकादायक ठरू शकते. तसेच एटीएमच्या (ATM) माध्यमातून घडणाऱ्या गुन्ह्यांची संख्या मोठी आहे. यासाठी एटीएम वापरताना नेमकी कोणती काळजी घ्यावी, याबद्दल जाणून घेऊ या..

एटीएम मशीनचा वापर करायचा झाल्यास कायम गर्दीच्या ठिकाणी असलेल्या एटीएम सेंटरचा वापर करावा. फारशी वर्दळ नसलेल्या ठिकाणी जास्त फसवणुकीचे अधिक प्रकार घडतात. एटीएममधून रोकड काढत असताना आसपास लक्ष ठेवा. कोणी तुमच्यावर लक्ष तर ठेवत नाहीए ना, याची खात्री करून घ्या. एटीएममधून रोकड काढल्यावर मिळणारी पावती कुठेही फेकून नका. या पावतीवर असलेल्या मजकुराचा गैरवापर होऊ शकतो.व्यवहार पूर्ण झाल्यावर नेहमी कॅन्सल बटण दाबा. एटीएममधून निघताना कार्ड सोबत घेतलय का याची काळजी घ्या, सीटीव्ही कॅमेरा, सुरक्षा रक्षक असलेल्या एटीएमचा वापर करा. रोकड काढताना अपरिचित व्यक्तीची मदत घेऊ नका. एटीएममधून बाहेर पडण्याआधीच रोकड मोजून घ्या. सार्वजनिक ठिकाणी कधीही रोकड मोजू नका. तूमच्या खात्यातून रोख रक्कम काढल्याचा मेसेज आल्यास, पण एटीएममधून रोख न आल्यास तात्काळ बॅंकेकडे तक्रार करा. तूमचा पिन नंबर कोणालाही सांगू नका. बॅंक कधीही तूमचा पिन क्रमांक, पासवर्ड मागत नाही. त्यामुळे एसएमएसच्या माध्यमातून विचारणा होत असल्यास अशी कोणतीही माहिती देऊ नका.

You might also like