देवी विसर्जनादरम्यान दोन मंडळांमध्ये तुफान हाणामारी – एकाचा मृत्यू

मुंबई : वृत्तसंस्था – देवी विसर्जनासाठी आलेल्या दोन मंडळात तुफानी हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दादर चौपाटीजवळ काल रात्री १. ३० वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याचे समोर आले आहे. सदर मारहाणीत तरुण गंभीर झाला होता त्याला उपचारासाठी  केईएम रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’206457dc-d388-11e8-b7ae-c1e74640ed70′]

अनेक सार्वजनिक मंडळांच्या देवीचा विसर्जन सोहळा काल आनंदात पार पडला.  मात्र, या सोहळ्याला दादर परिसरात गालबोट लागले आहे. याचे कारण म्हणजे दोन मंडळात झालेली तुफान हाणामारी. मानखुर्द येथील जय भवानी महिला उत्सव मंडळ आणि धारावी येथील जय अंबे मित्र मंडळाच्या विसर्जन मिरवणूक दादर चौपाटीवर येत असताना या दोन मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाला. वादाचे रुपांतर हळूहळू हाणामारीत झाले. जय भवानी महिला उत्सव मंडळाचा कार्यकर्ता जगदीश नंदू कदम याला जय अंबे मित्र मंडळाच्या अविनाश अशोक नलावडे (वय – १९) आणि स्टेलिन यशवंत पुजारी (वय १९) यांनी बेदम मारहाण केली.  ही घटना काल रात्री १.३० वाजताच्या सुमारास सी ५ लेन येथे घडली.

बोगस नोकर भरती प्रकरण : भोकर नगरपरीषदचा मुख्य फरार आरोपी पोलिसांना शरण

त्यानंतर घटनास्थळी शिवाजी पार्क पोलिसांचे पथक पोहचले आणि गंभीर जखमी झालेल्या जगदीशला केईएम रुग्णालयात दाखल केले. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात अविनाश आणि स्टेलिनला भा. दं. वि. कलम ३०७ अन्वये जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने अटक करण्यात आली. मात्र उपचारादरम्यान आज सकाळी जगदीशचा मृत्यू झाल्याने या दोघांवर कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[amazon_link asins=’8192910962,8173711461′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’61edd753-d388-11e8-ab6f-65ee4f532adb’]