‘लॉकडाऊन’च्या काळात ‘या’ गायकानं ऑनलाईन कॉन्सर्टच्या माध्यमातून 64 दिवसात कमावले तब्बल 15 लाख रुपये !

पोलीसनामा ऑनलाइन  – देशातील कोरोनाची प्रकरणं पाहता सरकारनं पुन्हा लॉकडाऊन लागू केला आहे. या काळात अनेकांनी आपली नोकरी गमावली आहे. त्यामुळं अनेकांच्या कमाईवर खूप परिणाम झाला आहे. परंतु काही असेही लोक आहेत ज्यांनी या काळातही कमाईचे नवीन मार्ग शोधले आहेत.

असेच एक चेन्नईचे गायक आहेत सत्यन महालिंगम. सत्यन यांनी अनोख्या पद्धतीनं 64 दिवसातच 15 लाखांची कमाई केली आहे. या देशव्यापी लॉकडाऊनच्या काळात संगीतकार आणि गायक यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता.

याच काळात सत्यन यांनी अजिबात माघार घेतली नाही. सत्यन आधी प्रत्येक महिन्यात 40-50 प्रोग्राम करत असे. यातून त्यांन 50 हजाराच्या आसपास कमाई होत असे. परंतु लॉकडाऊनच्या काळात कार्यक्रम बंद असल्यानं मोठी अडचण झाली होती.

यावेळी सत्यन यांनी विचार केला की, कार्यक्रमांचं आयोजन सोशल मीडियावर केलं जाऊ शकतं. यानंतर त्यांनी फेसबुक आणि इंस्टावरून सत्यन उत्सव उपक्रमाला सुरुवात केली. या उपक्रमाअंतर्गत सत्यन यांनी 64 दिवसात फसेबुक आणि इंस्टावरून लाईव्ह स्ट्रीमिंग करत गाणं गायलं. त्यांनी म्युझिक फॉर म्युझिशियंस नावाचंही अभियान सुरू केलं आहे. या काळात त्यांनी गाणी गात 15 लाख रुपयांची कमाई केली.

सत्यन यांनी असं सांगितलं आहे की, कमाई केलेल्या पैशातून ते त्या लोकांची मदत कऱणार आहेत ज्यांच्यावर लाईफवर लॉकडाऊनमुळं परिणाम झाला आहे.