होय, लोकसभेच्या वेळीच मुख्यमंत्रिपदावरून झाली होती ‘बोलणी’, भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची ‘कबुली’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्रिपदावर भाजप शिवसेनेत चांगलाच वाद झाला. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले. परंतू मी खोटं बोलत नसून सत्य जनतेला माहित आहे असे सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपकडून आमची फसवणूक झाल्याचा आरोप लावला. पद आणि जबाबदाऱ्यांचे समसमान वाटप या निकषांवर आधारित महायुतीकडून निवडणूक लढवण्यात आली होती परंतू मुख्यमंत्रिपदावर दोन्ही पक्षात वाद विकोपाला गेला आणि युतीचे बिनसले.

25 वर्षांपासून असलेली भाजप सेनेची युती मुख्यमंत्रिपदावर संपुष्टात आली. एनडीएमधून देखील शिवसेना बाहेर पडली. यामुळे शिवसेना खासदारांची आसन व्यवस्थादेखील बदलण्यात आली. परंतू शिवसेना आणि आघाडीतील दोन्ही पक्षांचे महाशिवआघाडीचे सरकार स्थापन करण्याची तयारी सुरु आहे. भाजपला दूर ठेवण्याचा या नेत्यांकडून प्रयत्न करण्यात येत आहे. शिवसेना भाजपात लोकसभेपूर्वीच वादाची ठिणगी उडाली होती. तेव्हा देखील दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये वाद झाला होता हा वाद संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला होता, असे एका भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले.

भाजपच्या या ज्येष्ठ नेत्यांने सांगितले की लोकसभेत भाजपासोबत युती करण्यासाठी शिवसेनेने भाजपाकडे मुख्यमंत्रिपदाची अट घातली होती. मुख्यमंत्रिपद आणि जबाबदाऱ्यांचे सम समान वाटप या मुद्द्यावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली होती. तेव्हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शाहांना मध्यरात्री 2 वाजता फोन करुन चर्चा केली होती. शिवाय युती तुटली तर? असा प्रश्नही विचारला होता.

अमित शहांसह भाजपाचे काही नेते सेनेला मुख्यमंत्रिपद देण्यास इच्छुक नव्हते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युती तोडण्यास तयार नव्हते. त्यामुळेच अमित शाह स्वत: मातोश्रीवर आले होते. अमित शाह मातोश्रीवर आल्यानंतर शाह आणि उद्धव ठाकरे यांची बंद खोलीत चर्चा झाली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस चर्चेत उपस्थित नव्हते.

Visit : Policenama.com