Tinder Date Sex : सेक्स दरम्यान मुलीनं मुलाला गळा दाबायला सांगितलं, कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल (व्हिडीओ)

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन –  ब्रिटीश बॅकपॅकर ग्रेस मिलाने हीचा खून केलेल्या आरोपीने पोलिसांना हत्येमागील कारण सांगितले, हे ऐकून पोलिसही आश्चर्यचकित झाले आहेत. त्या व्यक्तीचे म्हणणे आहे की, सेक्सच्या वेळी ग्रेसने त्याला तिचा गळा दाबायला सांगितला होता, कारण ती फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे (50 शेड्स ऑफ ग्रे) चित्रपटाची मोठी चाहती होती.दुसर्‍या पोलिस चौकशीत आरोपीने म्हटले आहे की, ‘गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये 22 वर्षीय ग्रेसबरोबर झालेल्या टिंडर डेट वेळी ग्रेसने सांगितले होते की तिने तिच्या पूर्वीच्या प्रियकरबरोबर अनेक बीडीएसएम सेक्स टेक्निक्स ट्राय केले होते.

दोन दिवसांपूर्वी आरोपीने चौकशीत सांगितले की भेटल्यानंतर त्याने किस करून निरोप दिला जेणेकरून दुसर्‍या दिवशी 22 व्या वाढदिवशी तिला भेटता यावे पण आरोपीने प्रथमच तिचा मृत्यू झाल्याची कबुली दिली. त्या 27 वर्षीय व्यक्तीची ओळख लपवून ठेवली आहे. ग्रेसच्या मृत्यूनंतर आरोपीने तिचा मृतदेह विल्हेवाट लावण्यासाठी सुटकेसमध्ये ठेवला. दुसर्‍या दिवशी सकाळी आरोपीने ग्रेसचा मृतदेह शहराबाहेरच्या जंगलात पुरला आणि स्वत: ला ठार मारण्यासाठी अनेक गोळ्या खाल्ल्या. असे आरोपीने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले.

आरोपी अद्याप ग्रेस मिलानेच्या मृत्यूसाठी स्वत: ला जबाबदार मानत नाही. तो म्हणाला की जेव्हा त्याला झोपेतून जाग आली तेव्हा त्याने ग्रेसला फरशीवर पडल्याचे पहिले.तिच्या नाकातून रक्त बाहेर पडत होते.”मी तिला उचलले आणि तिला उठविण्याचा प्रयत्न केला.” मी तिला हलविण्याचा प्रयत्न करीत होतो. ती श्वास घेत आहे की नाही हे तपासले ,तीचा श्वास चालू नव्हता . तर तीचे शरीर पूर्णपणे थंड पडले होते, मी घाबरलो होतो.

आरोपीने सांगितले की मी रुग्णवाहिका बोलविली पण मला भीती वाटली म्हणून बटन दाबू शकलो नाही. त्यानंतर मी एका दुकानात गेलो आणि एक सुटकेस विकत घेतली. खोटे खाते तयार केले. आरोपीने पोलिसांना ती जागा दाखवली जिथे ग्रेसला आरोपीने नग्न पुरले होते. पोलिसांनी अनेक दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज पहिले त्यामुळे आरोपीच्या गुन्ह्याचा पर्दाफार्ष झाला.