आघाडी सरकारच्या काळातच सिंचन प्रकल्प रखडले : खा. सदाशिव लोखंडे

संगमनेर : पोलीसनामा ऑनलाइन – खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस – काँग्रेस आघाडी सरकारच्या काळातच सिंचन प्रकल्प रखडले आहेत. आठ कोटी ज्या प्रकल्पांची किंमत होती. ती दोन हजार कोटींच्या पुढे आज गेली आहे. असे वक्तव्य महायुतीचे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खा. सदाशिव लोखंडे यांनी केले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्यातील मतदान झाले आहे. येत्या २३ एप्रिलला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यामुळे मतदान राहिलेल्या मतदार संघांमध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. याचदरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार खा. सदाशिव लोखंडे यांनी मतदार संघातील संगमनेर तालुक्यातील गावांमध्ये प्रचार केला. गावातील मतदारांच्या त्यांनी भेटी घेतल्या. त्यावेळी, गेल्या ३५ वर्षांपासून ते सत्तेत असून पाण्याचा एक थेंबही अडवू शकले नाहीत. निळवंडे धरणाबरोबरच भोजापूर व आढळा धरणाचाही प्रश्नही त्यांनी भिजत ठेवला. इतके दिवस खासदार कधी दिसले नाहीत, असे बोलणारे दररोज मतदारसंघात आहेत. असे खा. सदाशिव लोखंडे यांनी म्हंटले.

याचबरोबर, भोजापूर धरणाची उंची वाढविण्याचा तसेच पूर चारीचा प्रश्न आहे. त्याचा प्रश्न अद्यापही निकाली निघालेला नाही. असेही त्यांनी म्हंटले. तसेच निळवंडे धरणासारखीच भोजापूर धरणाची देखील उंची वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असे आश्वासनही त्यांनी दिले.

इतकेच नव्हे तर, राष्ट्रवादी काँग्रेस – काँग्रेस आघाडी सरकारच्या काळातच खऱ्या अर्थाने सिंचन प्रकल्प रखडले आहेत. ज्या प्रकल्पांची किंमत त्यावेळी आठ कोटी होती. त्याच प्रकल्पांची किंमत आज दोन हजार कोटींच्या पुढे गेली आहे. अशी टीकाही त्यांनी केली.

Loading...
You might also like