एफटीआयआयमध्ये प्रोजेक्ट दरम्यान विद्यार्थी २२ फुटांवरून खाली कोसळले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

एफटीआयआयमध्ये फिल्म शूटिंगच्या दरम्यान दोन विदयार्थी २२ फुटाच्या उंचीवरून खाली पडल्याची घटना घडली आहे. या घटनेत हे विद्यार्थी जखमी झाले आहेत. हे विद्यार्थी डिप्लोमा इन फिल्म मेकिंगचे विद्यार्थी आहेत. विद्यर्थ्यांना दिला जाणारा प्रोजेक्ट करीत असताना ही घटना घडली.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, या घटनेबाबत पोलीसनामाने एका विद्यार्थ्याकडे विचारणा केली असता “या प्रोजेक्ट करीता बाहेरून शुटिंगचे सामान मागवले गेले होते. कॉलेज द्वारे दिल्या जाणाऱ्या प्रोजेक्ट करीता गरजेनुसार सामान मागवले जाते. प्रोजेक्टचे फिल्म शूटिंग करीत असताना दोन विद्यार्थी क्रेनवर चढले होते. पण शूटिंगच्या वेळी लावण्यात आलेली क्रेन खराब असल्यामुळे क्रेन तुटली आणि हे विद्यार्थी खाली जमिनीवर पडले. अशी माहिती एका विद्यार्थ्याने सांगितली. या घटनेत दोन्ही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत .

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f48b82cc-c3e9-11e8-9a79-4d6271f3917e’]

या घटनेत डायरेक्टर ऑफ फोटोग्राफीचे अनुज यांच्यासह एक विद्यार्थी क्रेनची जबाबदारी सांभाळत होता. या दुर्घटनेत हे विद्यार्थी जवळपास २२ फुटाच्या उंचीवरून खाली जमिनीवर कोसळले. या फिल्म प्रोजेक्टचे नेतृत्व निर्देशक ऋत्विक गोस्वमी नावाचा विद्यार्थी करीत होता. या घटनेत अनुजच्या खांद्याचे हाड मोडले आहे. या घटनेनंतर लगेचच उपस्थित विद्यार्थ्यानी जखमींना रुग्णालयात नेले. आता या दोघांची प्रकृती स्थिर आहे. उपचारानंतर या दोन्ही विद्यार्थ्यांना पुन्हा एफटीआयच्या हॉस्टेलमध्ये आणण्यात आले आहे.

[amazon_link asins=’B06ZZB71TB,B07437YHXP’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’061bf8ad-c3ea-11e8-a5f3-9567117c85c2′]

जाहिरात

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us