चोरी करताना दहा लाखाच्या नोटा जळून खाक 

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

गॅस कटरचा वापर करुन एटीएम मशिनमधील रोकड चोरी करताना लागलेल्या आगीत एटीएम मशीन मधील दहा लाख रुपयांच्या नोटा जळून खाक झाल्याची घटना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संभाजीनगर, चिंचवड  येथील एटीएममध्ये रविवारी पहाटे घडली.

याप्रकरणी सचिन शिव किरण काळगे (३५ रा. बापूजी बुवा नगर, थेरगाव) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टेट बँक ऑफ इंडियाचे संभाजीनगर येथील साई उद्यानासमोर एटीएम सेंटर आहे.

[amazon_link asins=’B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8350e787-8e2d-11e8-882f-512de977fc80′]

शनिवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास चोरटे येथील एटीएम मशिनमधील रोकड चोरण्यासाठी गॅस कटरच्या सहाय्याने मशिन कापत होते. मात्र त्यावेळीलागलेल्या आगीत साडेचार लाख रुपयांचे एटीएम मशीन जळून खाक झाले. तसेच एटीएम मशिनमध्ये असलेली दहा लाख ६७ हजार रुपयांची रोकडही जळून खाक झाली. अधिक तपास निगडी पोलिस करत आहेत.

जाहिरात