याबाबत मिळालेली आधीक माहिती अशी की, यावेळी साई भक्तांनी साई मंदिराच्या दक्षिणा पेटित तीन कोटी ८४ लाखांचे दान केले आहे. याशिवाय एक कोटी ५७ लाख रुपये देणगी काऊंटर वर देण्यात आले आहे. तर ऑनलाइन ट्रान्सफर, चेक आणि डीडी यांच्या माध्यमातून एक कोटी रुपये जमा झाले आहेत. साडेअकरा लाख रुपये किमतीचं ४३९ ग्रॅम सोने , तर दोन लाख ३० हजारांची साडेनऊ किलो चांदी साईचरणी दान करण्यात आली.
[amazon_link asins=’B01IBNMESI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’00ae98f2-9410-11e8-98c5-11661ee8bff6′]
दानपेटीत परकीय चलन
साईभक्त फक्त भारतातच नाही तर परदेशात देखील आहेत यावेळी साई बाबांच्या दान पेटीत परकीय चलन देखील मिळाले आहे. ही रक्कम एकूण ११ लाख २५ हजार रुपये इतकी आहे. मूळ भारतीय असलेल्या परदेशात राहणाऱ्या साई भक्तांचा देखील यात समावेश आहे.