व्ही व्ही आय पी चे आगामी निवडणूकी दरम्यान पोलीसांना द्यावी लागणार परिक्षा

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन –  रस्ता सुरक्षा सप्ताह चे निमित्त साधत शुक्रवारी पोलीस मुख्यालयातील विविध उपयोगी हॉल मध्ये शहरात होणाऱ्या निवडणूक व व्ही व्ही आय पी च्या सभा मध्ये सर्तकता बाळगावी लागेल. शहरातील कायदा, सुव्यवस्था आबाधित रहावी
यासाठी पोलीसांनी सुरक्षित, सर्तक राहण्याची गरज यासाठी आज दुपारी पोलीस मुख्यालयातील हॉल मध्ये प्रशिक्षणार्थी उप विभागिय पोलीस अधिकारी प्रमोद कुदळे यांनी दिल्लीत स्व.माजी राष्ट्रपती एपी जे अब्दुल कलाम यांचे बंदोवस्त वेळी एका सभा स्थळी कार्यक्रम दरम्यान घातपात करणाऱ्यांनी स्टेजच्या खालून जाणाऱ्या माईक वायर जागेवर अगोदर व्यवस्थित पणे कोटींग केले होते. परंतू सभा सुरु होण्याअगोदर काही तास पुर्वी परत त्याच जागी परत प्लास्टर ओलसर दिसले. ते लक्षात येताच वरिष्ठांना माहिती देऊन बॉम्ब शोधक पथक, श्वान यांचे कडून परत कसून तपासणी करण्यात आली. त्यात स्टेज जवळील माईक मध्ये स्फोट घडवून आणणे हा हेतू सर्तकतेमुळे निष्फळ ठरला अशी माहिती दिली. सर्तका बागळगावी असे आव्हान सहकारी यांना केले.

बॉम्ब शोधक पथकाचे पोलीस निरीक्षक शशीकांत सोनार यांनी सांगितले कि पोलीस सुरक्षीत तर जनता सुरक्षित. हेल्मेट बाबत उदाहरण देताना सांगितले कि नागरीक जागरूक असतात. पोलीस कर्मचारी हे हेल्मेट न घालता जाताना दिसले. त्यांनी लगेच पोलीसला सांगितले कि आम्हाला हेल्मेट घालायला सांगता तुम्ही ते हातात बाळगण्या पेक्षा डोक्यावर घाला.

अध्यक्षिय भाषणात हे शेवटचे असे पांढरे बोलताच सभागृहात स्मित हास्य सगळ्यांच्याच चेहऱ्यावर चटकन दिसले. मार्गदर्शन करताना गुन्हेगार, घातपात, अतिरेकी कारवाई करणारे हे पोलीस विचार करतात त्या पलिकडे जाऊन विचार करत घटना घडवतात. घटनावर नियंञण करणे पोलीसांचे काम आहे.परंतू एकट्याने हे कार्य होऊ शकत नाही. टिम वर्क गरजेचे असते.

नक्षल कारवाई ठिकाणी बंदोवस्तातील महत्वाचे प्रसंग कथन करत सर्तका महत्वाची आहे. काही दिवसांनी शहरात मोठे आव्हान आहे निवडणुका आहे. पोलीसांची परिक्षाच आहे. आपले सगळ्यांचे चांगले सहकार्यमुळे अलीकडीलच गणेश उत्सव, ईद सण चांगले पार पाडण्यासाठी चांगला बंदोवस्त तुम्ही केला.

शहरात व्ही व्ही आय पी च्या सभा, दौरे होणार आहे.सज्ज रहा सर्तक रहा असे आव्हान जिल्हा पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे यांनी केले. बॉम्ब शोधक पथकातील आधुनिक साहित्य वापर करुन धोके कसे टाळू शकतो या विषयी बॉम्ब शोधक पथकातील प्रत्येक आधुनिक साहित्य कसे हाताळावे याचे प्रात्याक्षिक सादर करत पो.नि.सोनारांनी माहिती दिली.

या कार्यक्रमावेळी व्यासपिठावर शहर उप विभागिय पोलीस अधिकारी सचिन हिरे,ग्रामिण उप विभागिय पोलीस अधिकारी संदिप गावीत.पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us