Pune : पुण्यात विकेंड Lockdown दरम्यान अत्यावश्यक सेवेची दुकानंही बंद, केवळ मेडिकलची सेवा सुरू; नियमांचं उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई – सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपुर्ण राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, पुण्यात आठवडयातील शनिवार आणि रविवार या दोन दिवशी कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. आता पोलिसांनी विकेंड लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवेची दुकाने देखील बंद ठेवण्यास सांगितले आहेत. त्यामध्ये केवळ मेडिकलच्या सेवांना वगळण्यात आलं आहे. नियमांचं उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पुण्याचे सह पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी एएनआय वृत्त संस्थेशी बोलताना दिली आहे.

पुण्यात विकेंड लॉकडाऊन दरम्यान काही व्यापार्‍यांनी दुकाने उघडी ठेवल्याने अनेक ठिकाणी गर्दी होत असताना दिसली होती. गर्दी वाढत असल्याने पुणे पोलिसांकडून आता अत्यावश्यक सेवांची दुकाने देखील बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा (मेडिकल सेवा वगळून) इतर दुकाने बंद राहणार आहेत. नियमांचं उल्लंघन करणार्‍यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पुण्याचे सह पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी एएनआय वृत्त संस्थेशी बोलताना दिला आहे. त्यामुळे पुणेकरांना आता शनिवार आणि रविवार या दोन दिवसांमध्ये अत्यावश्यक सेवा (मेडिकल सेवा वगळून) मिळणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे.