Coronavirus : ‘कोरोना’च्या संकटात् मधुमेहाच्या रूग्णांनी ‘ही काळजी घेणं गरजेचं

पोलीसनामा ऑनलाईन : कोरोना व्हायरसने सध्या संपूर्ण जगात थैमान घातले आहे. या विषाणूपासून बचापासून केंद्र सरकार, राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. केंद्र तसेच सामान्य नागरिकही याबाबत जागरूक असून आपल्यासोबत आपल्या कुटुंबीयांचा बचाव करण्याच्या उपायांकडे सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान जर आपण मधुमेह पीडित व्यक्ती असाल तर आपल्याला जास्त खबरदारी घेणे महत्वाचे आहे. कारण, लॉकडाऊन असल्याने हालचालींवर बंधन असल्याने एकाजागी बसून रक्तातील साखर वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मधुमेही रुग्णांमध्ये साखर अनियंत्रित पद्धत्तीने वाढल्याने ती इतर अवयवांप्रमाणे प्रतिकार शक्ती वर सुद्धा परिणामकारक ठरते. कोरोना संक्रमित रुग्णाची प्रतिकारक्षमता मजबूत असेल तर त्या विषाणूंना शरीर आपोआप मारून टाकते. पण ज्या व्यक्तींना मधुमेह आहे, त्यांची प्रतिकारशक्ती अगोदरच कमकुवत असते, त्यामुळे जर हे लोकं कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्कात आली तर ह्यांना संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. आणि ही गोष्ट डॉक्टरांच्या निदर्शनास आली आहे. दरम्यान, जर काही गोंष्टींची काळजी घेतल्यास मधुमेहींना कोरोना पासून स्वतःचा बचाव करणं अधिक सोपं जाईल.

१ ) शारीरिक हालचाल मंदावल्यावर रक्तातील साखर वाढु शकते. त्यामुळे घरी रक्तदाब पाहण्याचं यंत्र असल्यास वरचेवर रक्तातील साखर तपासा.

२) पुरेश्या औषधांचा मुबलक साठा जवळ ठेवा.

३) मधुमेही लोकांनी त्यांच्या फॅमिली डॉक्टरच्या संपर्कात रहाणे गरजेचे आहे. डॉक्तरांचा सल्ला वेळोवेळी घेत चला.

४) लो शुगर असल्यास साध्या कार्बोदकांचा आहारात समावेश असू द्या. आपल्या भारतीय अन्नामधून कर्बोदके मुबलक प्रमाणांत मिळतात.

५ ) खाण्यात कल्पकता आणा. नवीन काहीतरी खाण्याच्या नादात पथ्यं मोडू नका. यासाठी मोड आलेले मूग उत्तम पर्याय आहे. मग ते तुम्ही कच्चे खा किंवा मुगाचे डोसे खा.

६ ) दररोज व्यायाम करा, घरातल्या घरात किंवा गच्चीवर फिरा.

७) नेहीमच पुरेशी झोप घ्या. जागरणाने शर्करेची पातळी कमी/जास्त होऊ शकते. त्यामुळे पुरेशी झोप हा खूप महत्त्वाचा घटक आहे.

८) टीव्ही, इंटरनेट च्या माध्यमातून कोरोना विषयी, बाहेरच्या परिस्थिती विषयी माहिती घेत रहा. फोन वरून आपले मित्र मंडळी, नातेवाईकांच्या संपर्कात रहा.