Dussehra Melava | शिंदे गटाला मोठा धक्का! शिवाजी पार्कवर ठाकरेंचाच आवाज…, उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याला हायकोर्टाची परवानगी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटाच्या (Shide Group) दृष्टीने प्रतिष्ठेच्या झालेल्या दसरा मेळाव्याच्या (Dussehra Melava) लढाईत उद्धव ठाकरे गटाची (Uddhav Thackeray Group) सरशी झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) शुक्रवारी शिवसेनेच्या याचिकेवर झालेल्या सुनावणीत शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा घेण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. महापालिकेने शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट दोघांनाही शिवतीर्थावर दसरा मेळावा (Dussehra Melava) घेण्याची परवानगी नाकारली होती. त्यानंतर शिवसेनेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

शिवसेनेने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर (Petition) आज जवळपास साडेतीन तास युक्तीवाद करण्यात आला. शिवसेना, पालिका आणि शिंदे गटाच्या वकिलांकडून आपापली बाजू पटवून देण्याचा प्रयत्न केला. हा युक्तीवाद झाल्यानंतर उच्च न्यायालाने पालिकेचा निर्णय योग, उचित नाही असा शेरा मारत उद्धव ठाकरेंना शिवतीर्थावर दसरा मेळाव्याला (Dussehra Melava) परवानगी दिली. यावेळी कायदा आणि सुव्यवस्था (Law and Order) पाळण्याची हमी ठाकरे यांच्या वकिलांनी न्यायालयात दिली.

ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याचे व्हिडिओ रेकॉर्डिग करण्यास बंधनकारक केले आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास याचिकाकर्ते जबाबदार असल्याचे आढळल्यास भविष्यात त्यांच्या परवानगीवर परिणाम होईल, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. याचिकाकर्त्यांच्या म्हणजेच शिवसेनेच्या अर्जावर निर्णय घेताना पालिकेने आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदवले.

निकालात कोर्टाने नेमकं काय म्हटले?

आमचा निकाल देण्यापूर्वी आम्ही स्पष्ट करतो, खरी शिवसेना कुणाची यावर आम्ही भाष्य करत नाही.
तो विषय सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) आणि निवडणूक आयोगाकडे (Election Commission) प्रलंबित आहे. या निकालाच त्यांच्या सुनावणीवर किंवा निकालावर कोणताही परिणाम होणार नाही. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा हा गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. राज्य सरकारनं (State Government) शिवाजी पार्कचा वापर 45 दिवस विविध कार्यक्रमांसाठी राखीव ठेवला आहे. पालिकेच्या मागणीनंतर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) आपला अहवाल दिलेला आहे. दादर पोलीस स्टेशननं (Dadar Police Station) पोलीस संख्याबळ पाहता आपल्या अहवालात कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावर दोन्ही अर्ज फेटाळून लावण्याचं मत दिलेलं आहे. अर्ज फेटाळून पालिकेनं आपल्या अधिकारांचा दुरुपयोग केल्याचे स्पष्ट होतं, असं हायकोर्टाने म्हटले.

सरवणकर यांची याचिका फेटाळली

यावेळी उच्च न्यायालयाने सदा सरवणकर (Sada Saravankar) यांची हस्तक्षेप याचिका फेटाळली.
उच्च न्यायालयाने पालिकेला तुम्हाला यापूर्वी असे अर्ज आले होते का?
त्यावर त्यावेळी तुम्ही काय निर्णय घेतलात असा सवाल न्यायालयाने केला.
यावर पालिकेने 2017 मध्ये असा प्रसंग आला होता,
तेव्हा दोन्ही गटांमध्ये परस्पर समजुतीने दसरा मेळाव्याला परवानगी देण्यात आली होती.
मात्र आता परिस्थिती वेगळी आहे.
हे प्रकरण समजुतीने सोडविण्या सारखे नाहीय, असा युक्तिवाद पालिकेने केला.

Web Title :-  Dussehra Melava | Dussehra dasara melava of shiv sena at shivaji park on 5 octomber high courts decision in favor of uddhav thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Shrikant Eknath Shinde | राष्ट्रवादीने पोस्ट केलेल्या ‘त्या’ फोटोवर श्रीकांत शिंदेंचे स्पष्टीकरण; म्हणाले – ‘मी दोन टर्म खासदार आहे, मला…’

Ajit Pawar | जेव्हा जेव्हा उपमुख्यमंत्री झालो तेव्हा गृहमंत्री करा म्हंटलं, पण वरिष्ठांनी…, अजित पवारांनी बोलून दाखवली मनातली खदखद