धुळीची अ‍ॅलर्जी म्हणजे काय ? ‘ही’ याची ‘लक्षणं’, ‘कारणं’ अन् ‘उपाय’ !

धुळीची अ‍ॅलर्जी म्हणजे काय ?

धुळीमुळं होणाऱ्या र्हायनाइटिस, कंजंक्टिव्हायटीस, एक्झिमा आणि दमा यांचा त्रास होणं म्हणजे धुळीची अ‍ॅलर्जी होणं आहे. ज्यामुळं ही प्रक्रिया होते ते धुळीचे अॅलर्जन्स म्हणजे लहान कीटक असतात जे धुळीचा भाग असतात. या कीटकांना डस्ट माइट्स म्हणतात. यांचा आकार एवढा लहान असतो ते उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत.

काय आहेत याची लक्षणं ?

धुळीच्या अ‍ॅलर्जीचे अ‍ॅलर्जन्स हे घरात ओलसर वातावरणात वाढतात आणि आतील वातावरणासोबत जुळवून घेतात. याची लक्षणं पुढील प्रमाणे-

– शिंकणं
– नाक वाहणं
– डोळ्यांची जळजळ आणि डोळ्यातून पाणी येणं
– त्वचेची जळजळ
– नाक बंद होणं
– श्वास घेण्यास अडचण
– छातीत घरघर होणं
– झोपण्यात अडचण

काय आहेत याची कारणं ?

– त्वचेच्या मृत पेशी डस्ट माइट्सचं खाद्य असतं. यामुळं मुख्यत: घरगुती धूळ तयार होते.
– डस्ट माइट्स सारख्या अ‍ॅलर्जन्समुळं शरीरात अँटीबॉडीज प्रतिरक्षा प्रतिसाद तयार करतात.
– हे डस्ट माइट्स चटया, सतरंजी किंवा फर्निचरमध्ये असतात.
– काही बाबती धुळीचे कीटाणू अन्न दूषित करून ठेवतात.

काय आहेत यावरील उपचार ?

– अ‍ॅलर्जीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तोंडी स्टेरॉईड्ससारखी औषधं दिली जाऊ शकतात. यासाठी काही गोष्टींची काळजी घेणंही गरजेचं असतं.
– बेडशीट आणि उशा गरम पाण्यानं धुणं
– सतरंजी झाकून ठेवणं