Video : वाळू वाहतूकीसाठी पोलीस आणि महसूल विभागाला ‘एवढा’ हप्ता ; वाहतूकदारांचा आरोप

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – वाळू वाहतुकीचा परवाना असताना देखील पोलीस आणि तहसिलदार वाळूच्या गाड्या अडवून हप्ते वसुल करत असल्याचा आरोप वाळू ठकेदारांनी केला आहे. पोलीस आणि तहसिलदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी. यासाठी जिल्हाधीकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पोलीस आणि तहसिलदार यांच्या विरोधात घोषणा बाजी करण्यात आली.

बेकायदा वाळूची वाहतूक करणाऱ्या ठेकेदारांकडून लाखो रुपयांचा हप्ता घेऊन त्यांच्या गाड्या सोडतात. मात्र ज्यांच्याकडे परवाना आहे त्यांच्याकडूनही हप्ते वसुल केले जात आहेत. आरटीओ कडून वाळू वाहतूकीस मान्यता असताना देखील पोलीस प्रशासन आणि तहसिलदरांकडून आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचा आरोपी यावेळी करण्यात आला आहे.

महसूल अधिकारी आणि पोलीस हे बेकायदेशीर हप्ते वसूल करुन दुसऱ्या गाड्या सोडतात. मात्र, कायदेशीर वाहतुकीचे नियम पाळू देखील आमच्यावर अन्याय होत आहे. त्यामुळे पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असे निवदेनात म्हटले आहे. कारवाई न झाल्यास मालक आणि कामगार रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

एक रामबाण उपाय जो तुम्हाला म्हातारपणीही देतो तारूण्याचा अनुभव 

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो 

“केळी” आरोग्यासाठी उपयुक्त 

बाहेर जेवण करणे ठरू शकते मधुमेहाला निमंत्रण