गावाप्रती कर्तव्य : 5 ऑक्सिजन मेक मशीन व 10 पाण्याचे जार भेट !

लासलगाव – पुणे येथे नोकरीस असलेल्या लासलगाव येथील योगेश रामबीलास कासट आणि योगेश जगदीश डागा यांनी लासलगाव येथील कोरोना बाधीत रूग्णांची अडचण लक्षात घेवून ५ ऑक्सिजन मेक मशीन व व १० पाण्याचे जार भेट देत गावाप्रती कर्तव्य पार पाडले .

यावेळी हे साहित्य आता लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना बाधित रूग्णासाठी देण्यात येणार असल्याचे लासलगावचे माजी उपसरपंच संतोष डागा यांनी सांगितले . या वेळी सरपंच जयदत्त होळकर , पालकमंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंड , वसंत पवार , गुणवंतराव होळकर , ग्रा.प . सदस्य शेखर होळकर , उपसरपंच अफजलभाई शेख , ग्रा.प.सदस्या अमिता ब्रम्हेचा , पुष्पा आहिरे , गोकुळ पाटील , रवींद्र होळकर , संतोष ब्रम्हेचा , डॉ . विकास चांदर , डॉ . अविनाश पाटील , ललीत दरेकर , मिराण पठाण , विजय जोशी , सचिन होळकर आदी उपस्थित होते.