निवडणुकीच्या धामधुमीत साताऱ्यातील ‘तो’ DySp अँटी करप्शनच्या जाळ्यात ; पोलिस दलात खळबळ

सातारा :  पोलीसनामा ऑनलाईन – अँटी करप्शनच्या पथकाने साताऱ्यात एक मोठी कारवाई केली आहे. फलटणचे डीवायएसपी डॉ. अभिजीत पाटील यांना दीड लाखाहून अधिक लाच मागितल्याप्रकरणी अँटी करप्शनच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्याला अँटी करप्शनने ताब्यात घेतल्याने पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

डॉ. अभिजीत पाटील हे सातारा जिल्ह्यातील फलटण येथे डिवायएसपी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी एका प्रकरणात दीड लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची लाच म्हणून मागणी केल्याची तक्रार अँटी करप्शनकडे करण्यात आली होती. त्याप्रकरणी अँटी करप्शनच्या पथकाने बुधवारी रात्री त्यांना ताब्यात घेतले. राज्यात पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात सापडत असतानाच डीवायएसपी दर्जाचा अधिकारी लाच प्रकरणी सापडला आहे. त्यामुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान अभिजीत पाटील यांच्यासह आणखी कोणी या प्रकऱणात सहभागी आहे का? याचा तपास अँटी करप्शनकडून सुरु आहे.

एखाद्या लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास यासंदर्भात अँटी करप्शनच्या १०६४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन अँटी करप्शन पुणे चे पोलीस अधिक्षक संदिप दिवाणा यांनी केले आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक संदिप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधिक्षक सुषमा चव्हाण, उपअधिक्षक सुहास नाडगौडा व त्यांच्या पथकाने केली.