… म्हणून ‘त्या’ पोलिस उपाधिक्षकाचे (DySp) तडकाफडकी निलंबन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गडचिरोलीतील कुरखेडा येथे महाराष्ट्र दिनी झालेल्या नक्षलवादी हल्ल्याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे यांना निलंबित करण्यात आले आहे. अशी माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. शैलेश काळे यांनी सुरक्षेचे नियम डावलल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

राज्यात महाराष्ट्र दिन साजरा केला जात असताना नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत पोलिसांच्या क्यूआरटी पथकाची गाडी भुसुरुंग स्फोट करून उडवून देण्यात आली होती. त्यात १५ पोलीस शहिद झाले. तर एका चालकाचाही मृत्यू झाला आहे. आईडी स्फोटके पेरून त्यांनी भ्याड हल्ला करत पोलिसांची गाडी उडवली होती. नक्षलवाद्यांकडून जाळण्यात आले होते. पोलिसांचे क्यूआरटीचे पथक या घटनास्थळाकडे जात असतानाच नक्षलींनी हा हल्ला घडवून आणला. त्यात गाडीच्या चिंधड्या उडाल्या होत्या.

शहिदांना मानवंदना देण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांकडे शहिदांच्या कुटुंबियांनी काळे यांच्यावर आरोप केले होते. त्यांच्या बेजबाबदारपणामुळे पोलिसांचा हकनाक बळी गेल्याचा आरोप करण्यात आला होता. प्रशासनाने शैलेश काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठविले होते. त्यानंतर शैलेश काळे यांनी हयगय केल्याचा ठपका ठेवून त्यांची नंदूरबारला आदीवासी विकासच्या जात पडताळणी समितीत त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

त्यासोबतच विधिमंडळातही विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शैलेश काळे यांच्यावर कडक कारावाई करण्याची मागणी केली होती. शैलेश काळे यांच्यावर सुरक्षेचे नियम डावलल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आज त्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

आरोग्यविषयक वृत्त –

मधुमेह, मानसिक आजार आणि हृद्यरोगाला दूर ठेवण्यासाठी करा हे “प्राणायम” 

ह्रदयाची घ्या अशी काळजी , कधीही होणार नाहीत ब्लॉकेजेस …! 

आजपासून योगा करण्याचा संकल्प करणार असाल तर ‘या’ आसनांपासून करा सुरुवात 

गर्भधारने दरम्यान महिलांनी घ्या व्यायामाची अशी ” काळजी ”