लघवी करताना जळजळ, त्रास, रंग बदलणं अन् लघवी कमी होणं यावर 5 सोपे रामबाण उपाय ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   डायसुरिया (Dysuria) एक अशी स्थिती आहे ज्यात लघवी करताना (Painful Urination) त्रास होतो. हे सामान्यपणे संक्रमणामुळं होतं. हा रोग महिलांमध्ये जास्त पहायला मिळतो. परंतु पुरुषही याची शिकार होऊ शकतात.

लघवी करताना जळजळ होण्याची कारणं –

मुत्रमार्गात संक्रमण (युटीआय) किंवा लैंगिक संबंधातून पसरणारे आजार ही डायसुरियाची प्रमुख कारणं आहेत. डायबिटीज किंवा कॅन्सरसारख्या जुन्या आजारांचे ते संकेतही असू शकतात.

लघवीची जळजळ किंवा त्रास यावर काही घरगुती उपचार पुढीलप्रमाणे –

1) भरपूर पाणी प्या –  जेव्हा तुम्ही जास्त पाणी पिता तेव्हा तुमचं शरीरा जास्तीत जास्त विषारी पदार्थांना बाहेर टाकण्यास सक्षम असतं. यामुळं लघवी करताना जळजळ कमी होते. यामुळं हायड्रेट राहणं गरजेचं आहे. दिवसातून किमान 8 ते 10 ग्लास पाणी पिलं पाहिजे.

2) प्रोबायोटीक्सचं सेवन करा –  डायसुरिया कधी कधी बॅक्टेरिया आणि फंगल इंफेक्शनमुळंही होतो. प्रोबायोटीक्समध्ये हेल्दी बॅक्टेरिया असतात. शरीरातील संक्रमणासोबत लढण्यासाठी त्याचा खूप फायदा होतो. इतकंच नाही तर अँटीबायोटीक्समुळं शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांपासून वाचण्यासाठीही याचा फायदा होतो. यासाठी आहारात दही, केफिर, सौकरकूट आणि किमची यांचं सेवन आवश्य करा.

3) लवंग तेल –  आतड्यांसंबधित परजीवी व कॅन्डिडासाठी हा एक प्रसिद्ध घरगुती उपाय मानला जातो. यामुळं रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. यामुळं फंगल आणि बॅक्टेरियल इंफेक्शन दूर होण्यास मदत होते. ब्लड थिनर वाल्या लोकांनी असं तेल घेण्यापासून दू रहायला पाहिजे.

4) व्हिटॅमिन सी वाले फूड –  यामुळं आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शरीरातील सर्व प्रकारच्या संक्रमणासोबत लढण्यासाठी याचा फायदा होतो. आंबट फळांव्यतिरीक्त तुम्ही भाज्यांचंही सेवन करू शकता. स्ट्रॉबेरी, कीवी, पपई, पेरू, अननस, आंबा, ब्रोकोली, केळी, स्प्राऊट्स असे पदार्थ जास्त खावेत.

5) इलयाची चावून खा –  पचनिक्रियेसाठी याचा खूप फायदा होतो. इलायची हा नैसर्गिक लघवीचं प्रमाण वाढवणारा पदार्थ आहे जो विषारी पदार्थ बाहेर टाकतो आणि पाणी टिकवून ठेवतो. स्ट्रोप्टोकोकस म्युटेंट, स्ट्रैफिलोकोकस ऑरिसस, कॅंडिडा अल्किबन्स आणि सैच्रोमाइसेस सेरेविसिया अशा अनेक विषाणूंना विलायची नष्ट करू शकते. 1 कप गरम दुथात एक कप इलयाची पावडर मिक्स करा आणि रात्री झोपण्यापूर्वी याचं सेवन करा.

टीप –   वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.