विना आधार नंबर डाऊनलोड करा E-Aadhaar, फक्त करावे लागेल हे काम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – E-Aadhaar आजच्या काळात ओळखीसाठी आधार (Aadhaar) हे सर्वात जास्त वापरले जाणारे दस्तऐवज आहे. सिम कार्ड खरेदी करण्यापासून पासपोर्ट मिळवण्यापर्यंत आधार कार्डचा (Aadhaar Card) वापर ओळखीचे दस्तऐवज म्हणून केला जात आहे. कोविडची लस घेण्यासाठीही आधार कार्ड आवश्यक आहे. आधार कार्ड 12 अंकी युनिक नंबरसह येते, जो UIDAI द्वारे जारी केला जातो. आधार कार्ड धारकासाठी 12 अंकी क्रमांक खूप महत्त्वाचा आहे. याद्वारे तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर E-Aadhaar सहज डाउनलोड करू शकता.

 

ई-आधार 28 अंकी एनरॉलमेंट आयडीद्वारे देखील केले जाऊ शकते. परंतु तुमच्याकडे 12 अंकी आधार क्रमांक किंवा 28 अंकी नावनोंदणी आयडी क्रमांक नसल्यास काय करावे? मग आधार कसे डाउनलोड करू शकता? या दोन गोष्टींशिवायही तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये E-Aadhaar डाउनलोड करू शकता. यासाठी तुम्हाला UID किंवा EID Retrieve करावे लागेल.

 

या प्रक्रियेतून मिळेल एनरॉलमेंट आयडी
सर्वप्रथम तुम्हाला यूआयडीएआयची अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जा. हे तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर किंवा वैयक्तिक संगणकावर कुठेही उघडू शकता. येथे तुम्हाला स्क्रोल करून Get Aadhaar च्या पर्यायावर यावे लागेल. जिथे तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. यूजर्सना येथे Retrieve EID/UID च्या लिंकवर क्लिक करावे लागेल.

 

येथे तुम्हाला आधार कार्ड क्रमांक किंवा नावनोंदणी आयडी निवडल्यानंतर आधार कार्डवर दिलेले नाव, क्रमांक किंवा ईमेल आयडीसह कॅप्चा प्रविष्ट करावा लागेल आणि नंतर पाठवा ओटीपी वर क्लिक करा. त्यानंतर ओटीपी भरा.

रजिस्टर मोबाईल क्रमांक आवश्यक
यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडीवर आधार क्रमांक किंवा एनरोलमेंट आयडी मिळेल. यानंतर तुम्ही आधार क्रमांक किंवा एनरोलमेंट आयडीच्या मदतीने ई-आधार सहजपणे डाउनलोड करू शकता. तुमच्याकडे आधार नोंदणीकृत मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. तरच तुम्ही हे काम करू शकाल.

 

असे डाउनलोड करा ई-आधार
ई-आधार डाउनलोड करण्यासाठी https://uidai.gov.in/ वेबसाइटला भेट द्या.
येथे Download Aadhaar च्या लिंकवर क्लिक करा.
आता येथे Download Aadhaar या पर्यायावर क्लिक करा.
येथे आधार क्रमांक आणि एनरोलमेंट आयडी दोन्ही पर्याय मिळतील.
तुमच्या नंबरवर मिळालेला तपशील इथे टाका.
कॅप्चा भरल्यानंतर, सेंड ओटीपी पर्यायावर क्लिक करा.
आता ओटीपी टाकून ई-आधार डाउनलोड करू शकतात.

 

Web Title :- E-Aadhaar | without aadhaar number and enrolment id how to download e aadhaar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics | फडणवीसांच्या ‘त्या’ दाव्याने शिंदे गटाचे टेन्शन वाढलं, लोकसभेची ‘ही’ जागा गमावणार?; राजकीय चर्चेला उधाण

 

Ganeshotsav 2022 | ‘हे गणराया’ बाप्पाचं गाणं श्रोत्यांच्या भेटीस ! शंकर महादेवन यांचा श्रवणीय आवाज

 

Mahlunge-Maan Town Planning Scheme | म्हाळुंगे-माण टीपी स्कीमच्या कामाला गती देण्याचे PMRDA च्या आयुक्तांचे आदेश