कानपूर : वृत्त संस्था – Bus Accident News | येथे एका ई बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने १७ वाहनांना धडक दिली. ही घटना टाटामिल चौकात रविवारी रात्री घडली असून यात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर १२ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (e-Bus Accident News)
मृत्यू झालेल्या तिघांची ओळख पटली असून शुभम सोनकर, ट्विंकल सोनकर, अरसलान अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात येत असून इतर मृतांचीही ओळख पटवण्यात येत आहे. तर जखमींना कृष्णा हॉस्पीटल आणि हैलट रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, ई बसची जबाबदारी आणि मेन्टेनन्सचे चालन करणाऱ्या पीएमआय एजन्सीने घटनेबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. (e-Bus Accident News)
उत्तर प्रदेश: कानपुर के घंटाघर से टाटमिल चौराहे की ओर जा रही एक बस दुर्घटना ग्रस्त हुई।
पूर्वी कानपुर के DCP प्रमोद कुमार ने बताया, “सूचना मिलते ही मौके पर पुलिस और एम्बुलेंस भेजी गई। दुर्घटना में 5-6 लोगों की मृत्यु की जानकारी मिली है। बस चालक की तलाश और राहत कार्य जारी है।” pic.twitter.com/NRVhfERgpo
— ANI_HindiNews (@AHindinews) January 30, 2022
याबाबत मिळलेली माहिती अशी की, रविवारी रात्री, घाटघर येथून ही बस टाटामिलकडे जात होती. हॅरिसगंज रेल्वे पुलावरुन उतरताच या ई-बसने कृष्णा हॉस्पीटलजवळून राँग साईडने धावायला सुरूवात केली होती. त्यात, चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने २ कार, १० दुचाकी, २ ई-रिक्षा आणि ३ टेम्पोला धडक देऊन टाटमिलकडे पुढे गेली. या धडकेमुळे एकच गोंधळ उडाला. या बसबे शेवटी टाटमिल येथे एका डंपरला जोराची धडक दिली. त्यानंतर, चालकाने धूम ठोकली. या अपघातात ६ जण ठार तर १२ जखमी झाले आहेत. पोलिसांनी या अपघाताची नोंद करण्याची कार्यवाही सुरु केली आहे.
Web Title : e-Bus Accident News | e bus hits 17 vehicles kills 6 injures 12 in kanpur road mishap
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट
Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या
Ankita Lokhande Bold Scene | अंकिता लोखंडेनं लग्नानंतर घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! म्हणाली – ‘नो टू..’