E-Commerce | अमेझॉन, फ्लिपकार्टसह 5 ई-कॉमर्स कंपन्यांना मोठा झटका, या महत्वाच्या नियमाचे करत नव्हते पालन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – E-Commerce | केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) Amazon, Flipkart आणि पेटीएम मॉलसह (Paytm Mall) 5 ई-कॉमर्स (E-Commerce) कंपन्यांना आणि अनेक विक्रेत्यांना भारतीय मानक ब्यूरो (BIS) च्या मानकांची पूर्तता न करणार्‍या प्रेशर कुकरच्या विक्रीसाठी नोटीस पाठवली आहे.

 

कंपन्यांकडून 7 दिवसात मागवला जबाब
CCPA ने मागील 18 नोव्हेंबरला या ई-कॉमर्स कंपन्या आणि त्यांच्या प्लॅटफॉर्मवर प्रेशर कुकर (Pressure Cookers) सादर करणार्‍या विक्रेत्यांना नोटीस जारी केली. त्यांच्यावर बीआयएस मानकांची पूर्तता न करणार्‍या कुकरची विक्री करण्याचा आरोप आहे.

 

ग्राहक प्रकरणे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सोमवारी सांगितले की, या प्रकरणात सीसीपीएने स्वतः दखल घेत कंपन्यांना नोटीस जारी केली आहे. त्यांना सात दिवसांच्या आत उत्तर देण्यास सांगितले आहे.

सीसीपीएने देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डिफेक्ट क्वालिटीच्या बनावट प्रॉडक्टविरुद्ध देशव्यापी कॅम्पेन चालवले आहे. एका अधिकार्‍याने सांगितले की, कुणीही ई-कॉमर्स कंपनी (E-Commerce) मानकांची पूर्तता न करणारी उत्पादने विकू शकत नाही.

 

त्यांनी म्हटले की, अशा E-Commerce कंपन्यांनी मानकांची पूर्तता केल्यानंतरच विक्रेत्यांना प्लॅटफॉर्मवर प्रॉडक्ट विकण्याची परवानगी दिली पाहिजे. त्यांनी जबाबदारीसह आपला व्यवसाय केला पाहिजे.

 

बनावट उत्पादनांविरूद्ध अभियान
याबाबत सीसीपीएकडून अगोदरच सर्व जिल्ह्यांना गाईडलाईन जारी करण्यात आली आहे.
यात म्हटले आहे की, कोणत्याही प्रकारच्या अवैध प्रॉडक्टची विक्री आणि ग्राहकांच्या अधिकाराचे हनन करणार्‍या प्रकरणांची सखोल चौकशी करण्यात यावी.

 

सोबतच सीसीपीएने ग्राहकांना जागरुक करण्यासाठी सुद्धा अनेक कॅम्पेन चालवले आहेत.
तसेच ग्राहकांना ISI क्वालिटीची प्रॉडक्ट खरेदी करण्याचे आवाहन केल आहे.

 

Web Title :- E-Commerce | e commerce entities come under ccpa lens for selling sub standard pressure cookers marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | वाळु व्यावसायिक संतोष जगताप खुन प्रकरण ! महादेव आदलिंगे टोळीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची ‘मोक्का’ कारवाई

Pune Crime | पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍याला 5 लाखाच्या खंडणीची मागणी; 4 लाख घेताना तिघांना खंडणी विरोधी पथकानं पकडलं

Universal Pension System | सरकारी कर्मचार्‍यांसाठी मोठी खुशखबर ! वाढू शकते निवृत्तीचे वय अन् पेन्शनची रक्कम, मोदी सरकार करतंय विचार, जाणून घ्या

LPG Subsidy | खुशखबर ! स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरवर मिळतेय सबसिडी, ग्राहकांच्या अकाऊंटमध्ये 237 रुपये ट्रान्सफर, ‘इथं’ तपासून पहा?

Pune Crime | पुण्यातील प्रसिध्द बांधकाम व्यवसायिक युवराज ढमालेंना गाडीखाली चिरडण्याची धमकी ! 15 लाखांच्या खंडणीप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात FIR