खुशखबर ! Paytm ने लाँच केले ‘क्रेडिट कार्ड’, १ % अनलिमिटेड ‘कॅशबॅक’ ; जाणून घ्या अधिक सुविधा

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – डिजिटल व्यवहारातील भारतातील सर्वात मोठी कंपनी पेटीएमने आपल्या ग्राहकांसाठी नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पेटीएमने काल क्रेडिट कार्ड लाँच केले आहे. याला ‘पेटीएम फर्स्ट कार्ड’ असे नाव देण्यात आले आहे. हे कार्ड वापरण्यासाठी तुम्हाला वर्षाला ५०० रुपये मोजावे लागणार आहेत. यासाठी कंपनीने सिटी बँकेबरोबर करार केला आहे. कंपनी या कार्डवरील व्यवहारावर १ टक्के कॅशबॅक देखील देणार आहे.

याअगोदर कंपनीने २०१७ मध्ये आपले डेबिट कार्ड लाँच केले होते. या कार्डद्वारे तुम्ही प्रत्येक महिन्याला १ लाखांपर्यंतची खरेदी करू शकता. या क्रेडिट कार्डचा वापर तुम्ही कुठेही करू शकता. यामुळे ग्राहकांना आता खरेदीचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे. तुही भरलेली ५०० रुपये फी जर तुम्ही ५० हजारापेक्षा जास्त रुपयांची खरेदी केली तर माफदेखील होणार आहे.

दरम्यान, आजच्या डिजिटल युगात डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या वाढत्या वापराकडे बघून कंपनीने हि सुविधा सुरु केली असल्याचे बोलले जात आहे.

You might also like