‘या’ कारणामुळं ‘लॉकडाऊन’मध्ये इन्कम टॅक्स विभागानं 16.84 लाख करदात्यांच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केले 26242 कोटी, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : प्राप्तिकर विभागाने एप्रिलपासून 16.84 लाख करदात्यांना 26,424 कोटी रुपयांचा कर परतावा जारी केला आहे. कोविड – 19 संकटादरम्यान, लोक आणि कंपन्यांना रोख रक्कम देण्यासाठी विभागाने परतावा देण्याचे काम अतिशय वेगवान केले आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) शुक्रवारी सांगितले की, 1 एप्रिल ते 21 मे दरम्यान 16,84,298 करदात्यांना परतावा मिळाला. सीबीडीटीने सांगितले की, 15,81,906 करदात्यांना 14,632 कोटी रुपयांचे प्राप्तिकर परतावा देण्यात आला. त्याच वेळी, 1,02,329 करदात्यांना कॉर्पोरेट कर परतावा देण्यात आला.

गेल्या आठवड्यात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आत्मनिर्भर भारत मोहिमेच्या घोषणेनंतर परताव्याचा मुद्दा आणखी तीव्र केला. सीतारमण म्हणाल्या कि, आम्ही परतावा देण्यास उशीर करत नाही. आम्ही त्याला थांबवून बसलो नाहीत. आम्ही आपल्याला जलद परतावा देत आहोत, कारण यावेळी आपल्याला पैशांची आवश्यकता आहे आणि ती आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे. आमच्या प्रोत्साहनाच्या मोजणीत आम्ही कर परतावा पैशाचा समावेश केलेला नाही.

सीबीडीटीने 16 मे रोजी मागील आठवड्यात 37,531 करदात्यांना 2,050.61 कोटी रुपयांचा परतावा दिला. त्याचप्रमाणे कॉर्पोरेट करदात्यांना 867.62 कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला. त्याच वेळी 21 मे रोजी संपलेल्या आठवड्यात म्हणजेच 17 मे ते 21 मे दरम्यान 1,22,764 करदात्यांना 2,672.97 कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला. त्याचबरोबर 33,774 कॉर्पोरेट करदात्यांना 6,714.34 कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला.

You might also like