सावधान ! इनकम टॅक्स विभागाकडून करदात्यांना इशारा, ITR भरण्याची अंतिम तारीख वाढविल्याचा मेसेज ‘फेक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इनकम टैक्स डिपार्टमेंटने पुन्हा एकदा लोकांना चेतावणी दिली आहे की सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली टॅक्स रिटर्नसाठी डेडलाईन वाढली असल्याची बातमी खोटी आहे. इनकम टैक्स डिपार्टमेंटने ट्विट करत याबाबतचा खुलासा केला आहे.

फेक न्यूज पासून सावध राहण्याचे आदेश
इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या ट्विटनुसार सोशल मीडियावर पसरवण्यात येणारी बातमी खोटी आहे. या बातमीमध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टैक्सेस (CBDT) ने IT रिटर्न भरण्याची तारीख 30 सप्टेंबर वरून वाढवून 15 ऑक्टोबर केली आहे. मात्र IT डिपार्टमेंट ने ही बातमी खोटी असल्याचे सांगत असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

30 सप्टेंबरच आहे शेवटची तारीख
कंपन्या, फर्म चे वर्किंग पार्टनर, इंडिविजुअल किंवा अन्य एंटिटी ज्यांच्या अकाउंट्सची ऑडिटिंग जरूरी आहे अशांसाठी ITR भरण्याची अंतिम तारीख ही 30 सप्टेंबरच असणार आहे. ज्यांना ऐसे एसेसीज नुसार सेक्शन 92 ई प्रमाणे रिपोर्ट द्यावा लागतो त्यांच्यासाठी अंतिम तारीख 30 नोव्हेंबर असणार आहे.

दोन महिन्यातील ही दुसरी वेळ आहे ज्यात डिपार्टमेंटला दोनदा रिटर्न फाईल बाबतची माहिती द्यावी लागली आहे. आधीही अशाच एका तारखेची अफवा सोशल मीडियावर फिरत होती.

अनेक लोकांना चुकीचे संदेश आणि इमेल मिळत होते त्याबाबत इनकम टॅक्स ने लोकांना चेतावणी देत सतर्क राहण्याचा इशारा दिला होता.