Welcome 2021 : E – लर्निंग पकडेल Speed; मोबाईल, Google होतील गुरू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा, महाविद्यालय बंद आहेत. त्यामुळे सध्या सर्वत्र ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षात ऑनलाइन शिक्षणाचा उपाय अंमलात आणण्यात आला. आता लर्निंगची ही नवी पद्धत मूळ धरू लागली. त्यामुळे अध्यापनाची रचना बदलू लागली आहे.

ऑनलाइन रोजगारांत अधिकाधिक संधी
ऑनलाइन व्यवहारांमुळे या क्षेत्रातील रोजगारांत अधिकाधिक संधी असतील. त्यात बीपीओ, केपीओ, स्टार्टअप यांच्याबरोबरचा ऑनलाईन ॲप्स समावेश आहे. शिक्षणाविषयीचे नवनवे ॲप विकसित करण्याची संख्याही वाढू लागली आहे. त्यामुळे स्थानिकांना नव्या प्रकारचे रोजगार प्राप्त होऊ लागले आहेत. २०२१ पासून सुरू होणाऱ्या नव्या दशकात नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. विद्यमान शिक्षणाचा चेहरामोहरा बदलून जाणार आहे

३-१८

– या वयोगटातील सर्वांना अनिवार्य शिक्षणाचा अधिकार बोर्डाची परीक्षा वर्षातून दोनदा

– पदवी आणि पदव्युत्तर परीक्षांच्या अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल

– क्षेत्रीय ते राष्ट्रीय पातळीवर आॅलिम्पियाड परीक्षा

– आवडीच्या विषयाचे शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य

– अनुभवावर अधिक भर

– कौशल्य विकासावर भर

दरम्यान, अनेक विदेशी विद्यापीठांच्या दूरस्थ शिक्षणाचा फायदा विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये वाढ होईल, त्यासाठी ३ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. शिक्षणाचा खर्च भारतातील ऑनलाईन शिक्षणाच्या क्षेत्रातील प्रगती दरवर्षी १५ टक्के होत आहे.

– ९५ लाख युजर्स यंदा ऑनलाइन शिक्षण घेतील

– १. ९६ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचले ई लर्निंगचा कारभार