रिलेशनशिप स्टेटसवर बोलताना सोनाक्षी सिन्हा म्हणाली – ‘सिंगल आहे, पण मला लग्न करायचंय’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सोनाक्षी सिन्हा हिनं तिच्या रिलेशनशिप स्टेटसवर नुकतंच खुलून भाष्य केलं आहे. मी सिंगल आहे आणि मला लग्न करायचंय असं ती म्हणाली आहे. याशिवाय तिनं मेंटल हेल्थवरही भाष्य केलं आहे.

सिंगल असणं आणि लग्नाबद्दल काय म्हणाली सोनाक्षी ?
एका मुलाखतीत बोलताना सोनाक्षी सिन्हा म्हणाली, “मी सिंगल आहे परंतु हे स्विकार करणं खूपच फनी असेल की, मला कायमच लग्न करायचं होतं. ही अशी गोष्ट आहे ज्यासाठी आता वाट पहायला मी तयार आहे. मी माझं करिअर सेट केलं आहे याचा मला अभिमान आहे. मी एका अशा पातळीवर आले आहे जिथं राईट पर्सनची वाट पाहण्यात गैर काहीच नाही. जेव्हे हे होईल(लग्न) तेव्हा मी खूप खुश असेल. त्याच्याआधीही आतापर्यंत मी खुशच आहे.”

बेडवर काय करतेस असं विचारल्यानंतर सोनाक्षी म्हणाली, “मी जास्त करून झोपण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून चांगला मूड राहिल. परंतु अनेकदा असं होत नाही. तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करायला हवं. माझ्यासाठी पेटींग्स आहेत, कॅनव्हासवर टाईम घालवणं आहे. मी डान्सही करते.” असंही तिनं सांगितलं.

सोनाक्षीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती अजय देवगणचा सिनेमा भुज : द प्राईड ऑफ इंडिया या सिनेमात दिसणार आहे. सिनेमात तिनं एका गुजराती महिलेची भूमिका साकारली आहे. काही दिवसांपूर्वीच तिनं कलंक, खानदानी शफाखाना आणि दबंग 3 या सिनेमात काम केलं आहे.

https://www.instagram.com/p/CDAtQcHhfz2/

https://www.instagram.com/p/CC_aOXGB432/

https://www.instagram.com/p/CC02rXWhV6N/

 

https://www.instagram.com/p/CDDWEE0nf_5/

 

https://www.instagram.com/p/CDDQgYDjwUK/

 

https://www.instagram.com/p/CDBuENzB2El/

 

https://www.instagram.com/p/CDBJZjjgAwj/

 

https://www.instagram.com/p/CDBJa_qBh-t/

 

https://www.instagram.com/p/CDBBBKLBQQ1/