E-Pass in Maharashtra | तुम्हाला प्रायव्हेट वाहनानं एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास लागणार का ? जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात (maharashtra) आजपासून अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. या अंतर्गत राज्यातील निर्बंध टप्प्याटप्प्याने हटवण्यात येणार आहेत. त्यासाठी पॉझिटिव्हिटी रेट व ऑक्सिजन बेडच्या वापराचे प्रमाण यावर जिल्ह्यांची पाच गटात वर्गवारी करण्यात आली आहे. आजपासूनच नवे नियम लागू करण्यात आले असून यामध्ये महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आंतरजिल्हा प्रवासाचा. नव्या नियमावलीनुसार आता आंतरजिल्हा प्रवास करताना ई – पास E-Pass लागेल का यावरून बराच गोंधळ सुरु आहे. त्यावरून राज्यसरकारने केवळ ५ व्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये प्रवास करताना ई – पासची E-Pass आवश्यकता असेल असे स्पष्टकरण दिले आहे. त्यामुळे पहिल्या चार टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये प्रवास करताना आता ई – पासची E-Pass आवश्यकता भासणार नाही. दरम्यान, अनलॉकचा निर्णय शासकीय पातळीवर घेतला असला तरी स्थानिक परिस्थिती पाहून स्थानिक प्राधिकरणाला निर्बध हटवण्याचे किंवा ठेवण्याचे अधिकार देण्यात आले आहे.

कोरोनाबाधितांची संख्या घटू लागल्याने (maharashtra) राज्यातील (maharashtra) निर्बंध हटवण्याची मागणी होऊ लागली त्यानुसार पॉझिटिव्हिटी रेट व ऑक्सिजन बेडच्या वापराचे प्रमाण यावर राज्यातील जिल्ह्यांची पाच गटात वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार निर्बंध हटवण्यात येणार आहेत. दरम्यान, अनलॉक प्रक्रियेबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जिल्ह्यांचे वर्गीकरण केले असले तरी, सर्वानी कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सार्वजनिक कार्यक्रम, समारोह यासाठी गर्दी होणार नाही याची काटेकोर काळजी घेण्याचे आदेश दिले असून दैनंदिन व्यवहार किती उघडायचे, किती काळ सुरु ठेवायचे, त्याच्या वेळा या सर्व बाबीवर स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यायचा आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

आंतरजिल्हा प्रवास करायचा असेल तर ई – पास लागेल का ? यावर नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यावर आता सरकारने स्पष्टीकरण दिले असून केवळ पाचव्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये प्रवास करावयाचा असेल तर ई – पासची गरज आहे.
पहिल्या चार टप्प्यांमध्ये प्रवास करत असाल तर नियमितपणे वाहतूक सुरू आहे.
जेथे २० टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट असेल आणि ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड रुग्णांनी व्यापले असेल अशा जिल्ह्यांचा पाचव्या स्तरात समावेश होईल.
सध्यातरी ५ व्या टप्प्यात एकाही जिल्ह्याचा समावेश नाही.
पहिल्या टप्प्यात नियमितपणे सार्वजनिक वाहतूक सुरू राहणार आहे.
तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात १०० टक्के वाहतूक सुरू राहील.
परंतु उभे राहून प्रवास करण्यास परवानगी नाही.
तर चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात ५० टक्के सार्वजनिक वाहतूक प्रवास सुरु राहील तसेच उभं राहून प्रवास करण्याची परवानगी नाही.
त्याशिवाय माल वाहतूक करण्यासाठी ३ जणांना परवानगी असेल.
पाचव्या टप्प्यात माल वाहतूक करण्यासाठी ई – पासची आवश्यकता आहे.

लोकल ट्रेनने प्रवास करू शकता का ?
पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यामध्ये लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. परंतु तेथील परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासन यावर निर्णय घेऊ शकतात. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात वैद्यकीय व अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना प्रवास करता येईल. त्याचसोबत स्थानिक प्राधिकरणाच्या नियमांनुसार महिलांनाही प्रवेशास मुभा देण्यात आली आहे. तर चौथ्या आणि पाचव्या स्तरात केवळ वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा आहे.

Also Read This : 

Love is Blind | 3 लेकरांची आई असलेल्या काकीचं भाच्यावर जडलं ‘प्रेम’, ‘मज्जा’ करण्यासाठी गेली पळून पण…

 

रात्री ब्रा घालुन झोपणं सुरक्षित आहे का?