E-Passport | देशभरातील ‘E-Passport’ आता नाशिकमध्ये तयार होणार

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – E-Passport | देशभरातील सर्व ई – पासपोर्ट आता नाशिकमध्ये (Nashik) तयार होणार आहेत. याबाबत घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पात केली आहे. यामुळे आता नाशिकच्या इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये (India Security Press) सर्व ई – पासपोर्ट (E-Passport) बनणार आहे. आतापर्यंत नाशिकच्या इंडिया सिक्युरिटी प्रेसने चाचणीकरिता वीस हजार ई – पासपोर्ट तयार करून दिले आहेत. यापुढे दिवसाला 50 हजार ई – पासपोर्ट तयार केले जाणार आहे. म्हणून आता देशभरातील साधारण 25 ते 30 कोटी पासपोर्ट बनवण्याचे काम इंडिया सिक्युरिटी प्रेसला मिळणार आहे.

 

पासपोर्टची सुरक्षा आणि त्याचा गैरवापर टाळण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) महत्वाचा निर्णय घेतला आहे. दरम्यान पासपोर्ट बनवण्याचे काम मार्च महिन्यात हे सुरू होईल, अशी माहिती नाशिक येथील इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाचे सेक्रेटरी जगदीश गोडसे (Jagdish Godse) यांनी दिली आहे. दरम्यान आता अत्याधुनिक चिपच्या सहाय्याने ई – पासपोर्ट तयार केला जाणार आहे. हा निर्णय याआधीच घेण्यात आला होता. या निर्णयावर मंगळवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पातही अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharama) यांनी शिक्कामोर्तब केला आहे. (E-Passport)

दरम्यान, ई – पासपोर्ट प्रणाली (E-passport System) सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने (Central Government) घेतला. त्यानंतर नाशिकमध्ये या पासपोर्टची छपाई व्हावी यासाठी खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांनी पाठपुरावा केला होता. तर, नाशिक येथील इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाचे सेक्रेटरी जगदीश गोडसे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी देखील या निर्णयाचे स्वागत केलेय.

 

पासपोर्ट मधील कुठलिही माहिती लिक होणार नाही. त्यावरील डिजिटल स्वाक्षरी देखील सुरक्षित राहील.
यासाठी एक विशेष अशी चिप या पासपोर्टमध्ये बसवण्यात येणार आहे.
या पासपोर्टशी कोणी छेडछाड केली, तर त्याची माहिती संबंधित यंत्रणा पर्यंत पोहचणार आहे.
त्यामुळे या पासपोर्टचा गैरवापर टळणार आहे.
खरंतर याआधी 2 हजारांच्या नोटा चलनात आल्यानंतर त्याची छपाई देखील नाशिकमध्येच झाली होती.
आताही महत्वाचे काम नाशिकडेच आले आहे.

 

Web Title :- E-Passport | e passports all e passports across the country will be ready in nashik what is the decision of the central government

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा