e-RUPI  | सरकारने लाँच केला डिजिटल पेमेन्ट प्लॅटफॉर्म e-RUPI, कुठे होईल वापर आणि कसे करते काम, जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

नवी दिल्ली : वृत्त संस्था – e-RUPI | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी डिजिटल पेमेन्ट सोल्यूशन ( Digital Payment Solution) e-RUPI सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (Video Conferencing) लाँच केले. e-RUPI एक प्रीपेड इलेक्ट्रॉनिक व्हाऊचर
(Prepaid Electronic Voucher) आहे, जे यूजरला SMS किंवा क्यूआर कोड (QR Code) च्या रूपात मिळते आणि यास क्रेडिट किंवा डेबिट कार्डशिवाय (Credit, Debit Card) मोबाइल अ‍ॅप (Mobile App) किंवा इंटरनेट बँकिंगने (Internet Banking) रिडीम केले जाऊ शकते. हे नॅशनल पेमेन्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने तयार केले आहे. याद्वारे कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस पेमेन्ट केले जाऊ शकते. यासंबंधीच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेवूयात :

प्रश्न : काय आहे डिजिटल पेमेंट सोल्यूशन e – RUPI?

उत्तर : ई-रुपी एक क्यूआर कोड किंवा एसएमएस स्ट्रिंग-आधारित ई-व्हाऊचर आहे, जे बेनिफिशियरीच्या मोबाइलवर पोहचवले जाते.
या वन टाइम पेमेन्ट मेकॅनिज्मद्वारे यूजर्स, डिजिटल पेमेन्ट अ‍ॅप किंवा इंटरनेट बँकिंग अ‍ॅक्सेस न करता व्हाऊचर रिडीम करू शकतील.
याद्वारे कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस पेमेंट होईल.

प्रश्न : कुठे होऊ शकतो e-RUPI डिजिटल व्हाऊचरचा वापर?

उत्तर : याचा वापर आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, (Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Health Scheme) विविध वेल्फेयर स्कीम्स अंतर्गत सर्व्हिस देण्यासाठी केला जाऊ शकतो. खासगी क्षेत्रसुद्धा कर्मचारी कल्याण आणि सीएसआर कार्यक्रमात या डिजिटल व्हाऊचरचा लाभ घेऊ शकते.

प्रश्न : काय आहेत या प्लॅटफॉर्मचे फायदे?

उत्तर : ही एक अशी सिस्टम आहे, ज्यामध्ये पारदर्शक आणि सोप्या पद्धतीने व्यवहार शक्य आहे. सोबतच लाभार्थ्यांना विना झंझट योजनेचा लाभ थेट मिळेल.

प्रश्न : कसा करायचा आहे याचा वापर

उत्तर : याचा वापर करणे अतिशय सोपे आहे. समजा तुम्हाला एखाद्या हॉस्पिटलचे पैसे भरायचे आहेत. यासाठी तुमच्याकडे व्हाऊचर असेल. ते सरकार किंवा कुणीही व्यक्ती पाठवू शकते. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम e-RUPI अ‍ॅप ओपन करून व्हाऊचर काढावे लागेल. यानंतर हॉस्पिटलमध्ये e-RUPI व्हाऊचर दाखवावे लागेल. तुमचे व्हाऊचर QR कोडमध्ये बदलले जाईल. यानंतर हॉस्पिटलचे कर्मचारी QR कोड स्कॅन करतील. स्कॅन करताच तुमच्याकडे एक व्हेरिफिकेशन कोड येतो. व्हेरिफिकेशन कोड सांगताच तुमचे व्हाऊचर रिडीम होते. यानंतर पेमेन्ट यशस्वी होते.

 

प्रश्न : कसे होईल व्हाऊचर जनरेट?

उत्तर : ही सिस्टम एनपीसीआयने आपल्या यूपीआय प्लॅटफॉर्मवर बनले आहे आणि सर्व बँका ती जारी करतील. लाभार्थ्याची ओळख मोबाइल नंबरद्वारे होईल आणि सर्व्हिस प्रोव्हायडरला व्हाऊचर जनरेट करण्यासाठी बँकेशी संपर्क करावा लागेल. बँक सेवा प्रदात्याला व्हाऊचर अलॉट करेल, ज्यानंतर हे व्हाऊचर लाभार्थ्याला जारी केले जाईल. लाभार्थी केवळ त्याच कामासाठी व्हाऊचरचा वापर करू शकतो, ज्यासाठी हे व्हाऊचर जारी केले आहे.

प्रश्न : कोणत्या बँका करतील जारी?

उत्तर : भारतीय स्टेट बँक (SBI), आयसीआयसीआई बँक,
एचडीएफसी बँक, पंजाब नॅशनल बँक (PNB),
अ‍ॅक्सिस बँक आणि बँक ऑफ बडोदा e-RUPI कूपन जारी आणि रिडीम करण्याच्या दोन्ही सुविधा देतील.
याशिवाय कॅनरा बँक, इण्डसइण्ड बँक, इंडियन बँक,
कोटक महिंद्रा बँक आणि यूनियन बँक ऑफ इंडिया सध्या केवळ e-RUPI कूपन जारी करतील.

Web Title : e-RUPI | how to use e rupi you need to know about digital
payment solution check all details here

Anti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार आणि
संगणक ऑपरेटर अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Mumbai New Regulations | मुंबईत सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत सुरु राहणार,
नवी नियमावली जाहीर