E-Sharam Portal | खुशखबर ! 38 कोटी लोकांसाठी मोदी सरकारने लाँच केले ई-श्रम पोर्टल, जाणून घ्या काय आहे ते आणि त्याचे फायदे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था E-Sharam Portal | असंघटित क्षेत्रात कार्यरत देशातील कोट्यवधी कामगारांना आज मोदी सरकार (Modi government) ने मोठी भेट दिली. सरकारने कामगारांचे हित लक्षात घेऊन ई-श्रम पोर्टल (E-sharam Portal) लाँच (launch) केले आहे. यावेळी केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री (Union Minister for Labor and Employment) भूपेंद्र यादव (Bhupendra Yadav) आणि कामगार राज्यमंत्री (Minister of State for Labor) रामेश्वर तेली (Rameshwar Teli) उपस्थित होते.

रजिस्ट्रेशन सुद्धा सुरू झाले (laborers Registration also started)

पोर्टल लाँच केल्यानंतर मजूरांचे रजिस्ट्रेशन सुद्धा सुरू झाले. मजूरांचा यावर डाटाबेस तयार होईल.
ज्याच्या मदतीने सरकार सोशल सिक्युरिटी योजना त्यांच्या दरवाजांपर्यंत पोहचवणार आहे.

मजूरांपासून फेरीवाले-विक्रेत्यांना होणार फायदा

यापूर्वी केंद्रीय कामगार मंत्री भूपेंदर यादव यांनी म्हटले होते की, असंघटित क्षेत्रातील 38 कोटी कामगारांचा नॅशनल डाटाबेस म्हणजे ई-श्रम पोर्टल लाँच केले जात आहे.
या डाटाबेसमध्ये मजूर, प्रवासी मजूर, फेरीवाले-विक्रेता, घरगुती कामगार, बांधकाम कामगार,
गिग आणि प्लॅटफॉर्म वर्कर, शेतमजूर आणि असंघटित क्षेत्रातील दुसरे कामगार रजिस्ट्रेशन करू शकतात.

मजूरांना करावे लागेल नोंदणी

डाटाबेसच्या लाँचनंतर मजूरांना स्वताची नोंदणी करावी लागेल.
आपले नाव, कामाचे स्वरूप, पत्ता, शिक्षणिक पात्रता, कौशल्य, कौटुंबिक माहिती इत्यादी पूर्ण माहिती द्यावी लागेल.

सीएससीवर नोंदणी करू शकता

प्रवासी मजूर आपल्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) वर नोंदणी करू शकतात.
ज्या मजूरांकडे फोन नाही किंवा लिहिता वाचता येत नाही, ते सीएससी केंद्रांवर जाऊन नोंदणी करू शकतात.

 

ई श्रम कार्ड दिले जाणार

मजूरांच्या युनिक अकाऊंट नंबरचे एक रजिस्ट्रेशन कार्ड बनवले जाईल.
ज्यास ई श्रम कार्ड नाव दिले आहे. असंघटित आणि प्रवासी मजूरांच्या डाटाबेसला आधारसोबत जोडले जाईल.

नॅशनल टोल फ्री नंबर सुद्धा होणार जारी

यासोबतच असंघटित क्षेत्रात कार्यरत देशातील कोट्यवधी कामगारांच्या सुविधेसाठी सरकार एक नॅशनल टोल फ्री नंबर सुद्धा जारी करेल.
वर्कर या नंबरवर फोन करून पोर्टलवर रजिस्ट्रेशनसाठी आवश्यक माहिती घेऊ शकतील.

ई-श्रम पोर्टलवर रजिस्ट्रेशनसाठी त्यांना आधार नंबर आणि बँक खात्याची माहिती सुद्धा द्यावी लागेल.
हा नंबर 14434 आहे.

 

Web Title : E-Sharam Portal | Good news! Modi government launches e-labor portal for 38 crore people, knowing what it is and its benefits

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pravin Togadia | ‘भविष्यात नारायण राणे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात’, प्रविण तोगडियांचे वक्तव्य

Anti Corruption Trap | लसीकरणासाठी 400 रुपयाची लाच घेणारा रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime | गारवा बिर्याणी हॉटेल मालकावर कोयत्याने वार करुन फरार झालेले आरोपी गजाआड