e-Shram | ई-श्रम कार्डसाठी तात्काळ करा ‘अप्लाय’, काही समस्या असेल तर टोल फ्री नंबरवर करा कॉल; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – e-Shram | जर तुम्ही असंघटित क्षेत्रात काम करणारे श्रमिक आहात आणि तुमचा पीएफ कापला जात नसेल आणि ईएसआयसीचा लाभ मिळत नसेल, तसेच तुमचे वय 16 वर्षापेक्षा जास्त आणि 60 वर्षापेक्षा कमी आहे आणि इन्कम टॅक्स भरत नसाल तर ताबडतोब e-Shram कार्डसाठी अप्लाय करा. यामुळे एक रुपये देखील खर्च न करता दोन लाख रुपयांचा दुर्घटना विमा मिळण्याचा अधिकार तुम्हाला मिळू शकतो. याशिवाय आणखी खुप फायदे आहेत.

रजिस्ट्रेशन करण्याची पद्धत
सर्वप्रथम पोर्टल https://www.eshram.gov.in/ वर जा. रजिस्ट्रेशनसाठी आधार नंबर टाकताच तेथील डाटा बेसवरून कामगाराची सर्व माहिती आपोआप पोर्टवर दिसेल. व्यक्तीला आपल्या बँकेच्या माहितीसह मोबाइल नंबरसह दुसरी सर्व माहिती भरावी लागेल. हा ऑनलाइन फॉर्म नंतर अपडेटसुद्धा करता येऊ शकतो.

या टोल फ्री नंबरवर करा कॉल
व्यक्ती स्वता आपली नोंदणी करू शकते किंवा यासाठी देशभरातील कॉमन सर्व्हिस सेंटरची मदत घेत शकते. नोंदणीच्या नंतर व्यक्तीला युनिव्हर्सल अकाऊंट नंबरसह ई-श्रम कार्ड जारी होईल. रजिस्ट्रेशनसाठी सरकारने 14434 टोल फ्री नंबरसुद्धा ठेवला आहे, जिथे योजनेसंबंधी सर्व माहिती घेता येऊ शकते. या पोर्टलद्वारे राज्य सरकार सुद्धा आपल्या कामगारांचे रजिस्ट्रेशन करू शकतात.

27 लाख कामगारांनी केली नोंदणी
केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत असंघटित क्षेत्रातील 27 लाख कामगारांनी आतापर्यंत ’e-Shram’ पोर्टलवर नोंदणी केली आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री रामेश्वर तेली यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात म्हटले की, e-Shram पोर्टलवर असंघटित कामगारांच्या नोंदणीसाठी विविध शिबिरांचे आयोजन केले जात आहे. या पोर्टलचा जास्तीत जास्त प्रचार आणि पसार केला पाहिजे.

कशासाठी आहे ही योजना

केंद्रीय मंत्र्यांनी म्हटले की, सर्व असंघटित कामगारांचा एक राष्ट्रीय डेटाबेस तयार केल्याने सरकारला असंघटित कामगारांसाठी कल्याणकारी योजना आणि शेवटच्या स्तरापर्यंत वितरणावर लक्ष देण्यास मदत होईल.

रजिस्ट्रेशनमुळे कोणता फायदा होईल
केंद्रीय मंत्र्यांनी म्हटले की, पोर्टलवर नोंदणी केल्याने दोन लाख रुपयांचा अपघात विमा मिळेल.

जर कुणी कर्मचारी e-Shram पोर्टलवर नोंदणीकृत आहे आणि अपघातात त्याचा मृत्यू झाला किंवा स्थायी अपंगत्व आले तर त्याच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये आणि अंशता अपंगत्व आल्यास एक लाख रुपये मिळतील.

नोंदणी केल्यानंतर कामगारांना एक युनिक खाते क्रमांक पदान केला जाईल,
जो विशेष प्रकारे प्रवासी मजूरांसाठी सामाजिक सुरक्षा योजना,
रेशन कार्ड इत्यादीची पोर्टेबिलिटी सोपी बनवेल.

Web Titel :- E-Shram | eshram card registration process toll free number14434 benifits

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IPL 2021 | ‘मुंबई इंडियन्स’च्या टीमला धक्का ! रोहित शर्मा IPL च्या सामन्यांना मुकणार?

Manohar Mama Bhosale | मनोहर मामा भोसलेचा पुढील 5 दिवस पोलिस करणार ‘पाहुणचार’, न्यायालयाने दिला ‘हा’ आदेश

Pune Court | खून प्रकरणातील 3 सख्या भावांची निर्दोष मुक्तता, व्याजाच्या पैशातून झाला होता खून