e-Shram पोर्टलला मिळतोय जबरदस्त प्रतिसाद ! आतापर्यंत 1 कोटी कामगारांनी केले रजिस्ट्रेशन; 38 कोटी कामगारांना होईल फायदा

नवी दिल्ली : e-Shram | कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली (Rameshwar Teli) यांनी शनिवारी मजूर संघटनांना ई-श्रम पोर्टल (e-Shram Portal) बाबत असंघटित क्षेत्रातील कामगारांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. या पोर्टलवर जवळपास एक कोटी मजूरांनी अगोदरच रजिस्ट्रेशन केले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

तेली यांनी शनिवारी आयआयआयटी-डी जबलपुर, मध्य प्रदेशमध्ये असंघटित क्षेत्रातील मजूर आणि पत्रकारांशी चर्चा केली. त्यांच्यासोबत केंद्रीय मुख्य कामगार आयुक्त डी. पी. एस. नेगी सुद्धा होते. कार्यक्रमात मंत्र्यांच्या हस्ते मजूरांना ई-श्रम कार्ड, कोविड-19 मदत योजना, अटल विमित व्यक्ती कल्याण योजना आणि विडी कामगार कार्डचे वितरण केले.

26 दिवसात पोर्टलवर जवळपास 1 कोटी रजिस्ट्रेशन

तेली यांनी दावा केला की, अवघ्या 26 दिवसात पोर्टलवर जवळपास एक कोटी रजिस्ट्रेशन करण्यात आले.
या दरम्यान मजूरांना या पोर्टलची माहिती सुद्धा देण्यात आली.
केंद्रीय मंत्र्यांनी मीडियाला सुद्धा आवाहन केले की, त्यांनी या पोर्टलची माहिती राज्याच्या सर्व भागात पोहचवावी.

38 कोटी कामगारांना होईल फायदा

e-Shram पोर्टल देशात 38 कोटीपेक्षा जास्त असंघटित कामगारांचे मोफत रजिस्ट्रेशन करेल आणि त्यांना सामाजिक सुरक्षा योजनांच्या वितरणात मदत करेल.
केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी असंघटित क्षेत्रातील 38 कोटी श्रमिकांचा डेटाबेस तयार करणे आणि त्याची देखरेख करण्यासाठी महिन्या अखेरीस ई-श्रम पोर्टल सुरू केले होते.
मजूरांना माहिती देण्यासाठी राष्ट्रीय टोल फ्री नंबर- 14434 सुद्धा जारी केला आहे.

हे देखील वाचा

SBI नं ग्राहकांना ‘त्या’ नंबर पासून केलं सावध, एका निष्काळजीपणामुळे बँक बॅलन्स होईल ‘झीरो’; जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  e-Shram | one crore registered on e sharm portal says rameshwar teli urges unions to spread awareness

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update