E-Shram Portal | आतापर्यंत 4 कोटी मजूरांनी केले रजिस्ट्रेशन; महिला कामगार आघाडीवर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  ई-श्रम पोर्टल (e-Shram Portal) वर मजूरांचे रजिस्ट्रेशन 4 कोटींच्या पुढे गेले आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने (Ministry of Labour and Employment) ने रविवारी ही माहिती दिली. हे पोर्टल दोन महिन्यापूर्वीच सुरू झाले आहे. प्रवासी मजूर, बांधकाम मजूर, गिग आणि प्लॅटफॉर्म मजूरांसह असंघटित मजूरांचा हा पहिला नॅशनल डाटाबेस आहे. पोर्टलवर (E-Shram Portal) रजिस्ट्रेशनद्वारे असंघटित क्षेत्रातील मजूर विविध सामाजिक सुरक्षा आणि रोजगार योजनांचा लाभ घेऊ शकतात.

कामगार मंत्रालयाने आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, विविध क्षेत्र म्हणजे बांधकाम, कपडा, मॅन्युफॅक्चरिंग, मत्स्य पालन, रस्त्यावरील फेरीवाले-विक्रेते, घरकाम करणारे,
कृषी आणि संबंधीत खेत्रातील लोक या पोर्टलवर रजिस्ट्रेशन करत आहेत.

वक्तव्यात म्हटले आहे की, अनेक क्षेत्रातील प्रवासी मजूरांनी सुद्धा पोर्टलवर (E-Shram Portal) रजिस्ट्रेशनमध्ये उत्साह दाखवला आहे.
ताज्या आकड्यांनुसार, या पोर्टलवर 4.09 कोटी मजूरांनी आपले रजिस्ट्रेशन केले आहे. यापैकी 50.02 टक्के महिला आणि 49.98 टक्के पुरुष कामगार आहेत.
आकड्यांनुसार ओडिसा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशकडून पोर्टलवर सर्वात जास्त रजिस्ट्रेशन होत आहे.
मात्र, छोटी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडून रजिस्ट्रेशन खुप कमी आहे.

कसे करू शकता रजिस्ट्रेशन

ऑनलाइन नोंदणीसाठी व्यक्तीगत मजूर मोबाइल अ‍ॅप किंवा वेबसाइटचा वापर करूशकतात.
याशिवाय सेवा केंद्र (CSC), राज्य सेवा केंद्र, कामगार सुगमता केंद्र, निवडक पोस्ट कार्यालये, डिजिटल सेवा केंद्रांवर जाऊन नोंदणी करता येते.

 

रजिस्ट्रेशनने होतील हे फायदे

E-Shram Portal वर नोंदणी केल्यानंतर मजूरांना डिजिटल ई-श्रम कार्ड दिले जाते.
ई-श्रम कार्डवर सार्वभौमिक खाते क्रमांक असतो, जो संपूर्ण देशात मान्य आहे. एखाद्या इतर ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा ते सामाजिक सुरक्षेस पात्र राहतात.

ई-श्रम पोर्टलवर रजिस्टर्ड मजूराचा मृत्यू झाल्यास किंवा त्यास कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास दोन लाख रुपयांची रक्कम दिली जाईल.
तात्पुरते अपंगत्व आल्यास एक लाख रुपयांची रक्कम दिली जाईल.

 

Web Title : E-Shram Portal | over 4 crore workers registered on e shram portal in under two months news in marathi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | पुण्यातील बड्या रुग्णालयात गरोदर महिलेला डॉक्टरकडून अमानुष मारहाण, शहरात प्रचंड खळबळ

Mumbai Crime | राज ठाकरेंच्या नावाखाली खंडणी मागणारी टोळी गजाआड ! मराठी चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्याला अटक; अभिनेत्रीला नोटीस

Sujay Vikhe Patil | पार्थ पवार-सुजय विखेंची अचानक भेट, राजकीय तर्क-वितर्कांना उधाण