e-Shram Portal | फायद्याची गोष्ट ! आजच करा e-Shram Portal वर आपले ‘रजिस्ट्रेशन’ आणि घ्या अनेक सरकारी लाभ; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जर तुम्ही सुद्धा असंघटित क्षेत्रातील कामगार आहात आणि अजूनपर्यंत e-Shram Portal वर आपले नामांकन केलेले नसेल, तर ते आवश्य करा. असंघटित क्षेत्रातील कामगारांना e-Shram Portal पोर्टलवर नामांकन केल्याने अनेक लाभ मिळतील. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने आपल्या ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. मंत्रालयाने ट्विटमध्ये म्हटले आहे की, असंघटित कामगार, ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करून अनेक लाभ प्राप्त करू शकतात. नोंदणीसाठी http://eshram.gov.in वर जा.

या अंतर्गत मिळणारे e-Shram कार्ड संपूर्ण भारतात स्वीकारहार्य असेल.
यामध्ये नोंदणी करणार्‍यांना PMSBY च्या अंतर्गत दुर्घटना विमा सुरक्षा दिली जाते.
अपघातात झालेला मृत्यू किंवा अस्थाई अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये आणि आंशिक अपंगत्व आल्यास 1 लाख रुपयांचे अनुदान दिले जाईल.

याशिवाय विविध प्रकारचे सामाजिक लाभ e-Shram द्वारे दिले जातील.
आपत्ती किंवा महामारी सारख्या कठिण परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारकडून मदत मिळवण्यात सहजता येईल.

काय आहे e-Shram Portal

असंघटित क्षेत्रातील मजूरांचा डेटाबेस बनविण्याच्या उद्देशाने सरकारने 26 ऑगस्टच्या दिवशी e-Shram portal लाँच केले होते.
या पोर्टलचा लोगो केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव (Bhupendra Yadav) यांनी लाँच केला होता.
या द्वारे कामगारांना विविध सुविधांचा लाभ दिला जाणार आहे.
याशिवाय मजूर आपल्या प्रश्नांच्या उत्तरासाठी राष्ट्रीय टोल-फ्री नंबर 14434 वर संपर्क साधू शकतात. सामाजिक सुरक्षा योजनांचे एकीकरण करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

 

Web Title : e shram portal registerd yourself on e shram portal and get these benefits provided by government

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Court | मुलीने नष्ट केले नानासाहेब गायकवाडच्या सावकारी व बेहिशोबी मालमत्तेचे पुरावे; पत्नी आणि मुलानेही केली मदत, जाणून घ्या आज कोर्टात काय झालं

EPFO | पीएफ खातेधारकांसाठी खुशखबर ! अप्लाय केल्यानंतर फक्त ‘इतक्या’ दिवसात मिळतेय रक्कम, जाणून घ्या

Nitin Landge Bribe Case | पिंपरी पालिकेतील स्थायी समितीवरील अ‍ॅन्टी करप्शनच्या कारवाईबद्दल अजित पवार म्हणाले…