पुण्यात ई-टॉयलेटला मिळाली मान्यता,स्मार्ट पुणे आणखी होणार स्मार्ट

पुणे:पोलीसनामा ऑनलाईन

पुणे शहराचे खासदार अनिल शिरोळे यांच्या खासदार निधीतून शहरात १४ ठिकाणी अत्याधुनिक ई-टॉयलेट बसवण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. मंगळवारी झालेल्या मनपाच्या सभेत ही मान्यता देण्यात आली. त्यामुळे स्मार्ट पुणे शहर आता आणखी स्मार्ट बनणार आहे.

ही टॉयलेट विद्युत शक्तीवर चालणारी असून , त्यात कॉईन टाकल्यानंतर त्याचे दार खुले होतील. वापरानंतर ती आपोआप स्वच्छ होऊन बाहेर पडले की दार बंद होईल अशा प्रकारची यंत्रणा यात बसवलेली आहे. याच्या वापरामध्ये वीज, पाणी यांचा वापर कमीतकमी होतो, त्यामुळे ही टॉयलेट अतिशय फायदेशीर ठरणार आहेत असे स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक व नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले. शौचालय तसेच स्वच्छतागृह याचा वापर करता येणार असल्याने याचा दुहेरी वापर होणार आहे.

E-Toiletsया १४ टॉयलेट मध्ये महिलांसाठी प्रत्येकी २ सीट असलेली १२ व पुरूषांसाठी प्रत्येकी १ सीट असलेली २ अशी एकूण १४ टॉयलेट शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी बसवण्यात येणार आहेत. जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, मॉडेल कॉलनी, हिरवाई उद्यान, भैरोबा नाला, गोखलेनगर, रामोशी वस्ती, कामगार पुतळा, कर्वेनगर, मावळे वस्ती इत्यादी ठिकाणी ही शौचालये ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुळीक यांनी यावेळी दिली. या टॉयलेटच्या रूपाने सुरु करण्यात येणारा अभिनव प्रयोग सफल होतो की , इतर टॉयलेटप्रमाणेच याची अवस्था होणार हे लवकरच समजेल