eAadhaar | आधारसोबत नसताना कसे पूर्ण होईल बँकिंगपासून तिकिट घेण्यापर्यंतचे प्रत्येक महत्वाचे काम, UIDAI ने दिली मोठी अपडेट

नवी दिल्ली : वृत्त संस्था – eAadhaar | भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने ट्विट करत माहिती दिली की आधार कार्डसोबत नसल्यास लोक काही पर्यायांचा वापर करून आपली महत्वाची कामे पूर्ण करू शकतात. यूआयडीएआयनुसार, आधार लेटर, ई-आधार (eAadhaar), एमआधार आणि आधार पीव्हीसी कार्ड सुद्धा समानप्रकारे मान्य आणि स्वीकारार्ह आहे.

आधार पत्र (Aadhaar Letter) किंवा एखाद्या साध्या कागदावर आधार कार्ड डाऊनलोड (Aadhaar PVC Card) केले गेले तरी सुद्धा ते पूर्णपणे वैध आहे. जर एखाद्या व्यक्तीकडे कागदावरील आधार कार्ड आहे तर त्यास आपले आधार कार्ड लॅमिनेट करणे किंवा पैसे देऊन तथाकथित स्मार्ट कार्ड करणे अनिवार्य नाही. तसेच, आधार कार्ड हरवले तर कोणतेही शुल्क न भरता https://eaadhaar&uidai&gov&in वरून ते डाऊनलोड करू शकता. ते प्लास्टिक/पीव्हीसीवर छापण्याची आवश्यकता नाही.

एमआधार सुद्धा आधारचे एक अधिकृत अ‍ॅप आहे.
या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही आधार सुरक्षित ठेवू शकता.
आधार कार्ड नसेल तर एमआधारचा वापर करून काम पूर्ण करू शकता.
या अ‍ॅपसोबत तुम्हाला आधारशी संबंधीत 35 पेक्षा जास्त सेवा दिल्या जातात.

Web Title : eAadhaar | uidai latest news updates aadhaar card holders eaadhaar and maadhaar valid and acceptable

Sangola Accident | सांगोला तालुक्यात ट्रक-कारचा भीषण अपघात;
कार चालकासह 2 लहान मुलींचा मृत्यू

Super Healthy Seeds | अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवतात ‘या’ 6 बिया,
जाणून घ्या त्यांचे फायदे

Bombay High Court | चित्रपट, गाण्यांच्या वाहिन्यांसारखी सरकार शिक्षणासाठी पूर्णवेळ वाहिनी का सुरु करत नाही?