पुण्यात चटणीत उंदीर, ‘एफडीए’च्या आदेशानंतर दुकान बंद

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यातील एका दुकानात सामोसाच्या चटणीत उंदीर आढळल्यामुळे खळबळ माजली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. यानंतर एफडीएने संबंधितांवर कारवाई करत दुकान बंद करण्याचे आदेश दिले आहेत. पण शारदा स्वीट्स चे मालक रामकिशन परदेशी यांनी हा सर्व प्रकार म्हणजे आपली बदनामी करण्याचा कट असल्याचा आरोप आहे.

[amazon_link asins=’B0748NPV86,B072XP1QB7′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’20d13e7e-b8b7-11e8-8d98-154ee1cd6810′]

कमला नेहरु हॉस्पिटलजवळच्या शारदा स्वीट्समध्ये ही घटना घडल्याचा दावा केला जात आहे. सुरुवातीला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या चटणीत उंदीर पडलेला असतानाही तब्बल १०० हून अधिक ग्राहकांनी तीच चटणी दिल्या गेल्याचा दावा या व्हिडिओमध्ये केला जात आहे.

शारदा स्वीट्स दुकानाचे मालक रामकिशन परदेशी यांनीही याप्रकरणी आपली बाजू मांडली. परदेशी यांच्या माहितीनुसार, एका ग्राहकाने जवळपास २०० समोसे आपल्या दुकानातून खरेदी केले होते. मात्र काही वेळात हा ग्राहक २०-२५ जणांसह पुन्हा आपल्या दुकानात आला आणि चटणीमध्ये उंदिर असल्याचं दाखवत गोंधळ घातला.

ग्राहकाने पोलीस तक्रार करण्याची धमकी देत परदेशी यांच्याकडे एक लाख रुपयांची मागणी केली. मात्र परदेशी यांनी या ग्राहकाला ४० हजार रुपये देत प्रकरण मिटवलं, अशी माहिती परदेशी यांनी ‘माझा’ला दिली. मात्र प्रकरण पैसे देऊन मिटवल्यानंतरही हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने हे प्रकरण उजेडात आलं आहे. दुसरीकडे ग्राहकाने केलेल सर्व आरोप खोटे असून आपली बदनामी करण्याचा कट असल्याचा आरोपही परदेशी यांनी केला आहे.

भारिप आणि एमआयएम राज्यातील निवडणुका एकत्र लढणार