नेते कर्तृत्वाने मोठे होतात जातीने नाही, भाजपच्या ‘या’ माजी मंत्र्याचा पंकजा मुंडेंना ‘टोला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काल पंकजा मुंडेंनी आपल्या भाषणात मांडले की भाजपावर ओबीसी नाराज आहेत. परंतु ओबीसी समाज हा भाजपावर नाराज नसून महाराष्ट्रात भाजपाची सत्ता आणण्यासाठी ओबीसी समाजाचा मोठा वाटा आहे. तसेच भाजपाबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून सर्व एकजुटीने काम करत आहेत. आणि पक्षात त्यांना योग्य ते स्थान देखील आहे. नेते हे कर्तृत्वाने मोठे होतात जातीने नाही असा टोला पंकजा मुंडेंना भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे. तसेच एक वृत्तवाहिनीशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हटले की, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात सर्व समाजातील लोकांना नेतृत्व मिळाले असून सगळ्यांना सोबत घेऊन ते चालतात असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

बावनकुळे पुढे म्हणाले की, महाराष्ट्राला पुढे आणण्यासाठी फडणवीसांनी खूप प्रयत्न केले असून त्यांच्या नेतृत्वामुळे आज महाराष्ट्रात भाजप हा पक्ष सर्वात मोठा पक्ष आहे. तसेच कोअर कमिटीमध्ये जे नेते आहेत त्यांनी नेहमी महाराष्ट्राला पुढे कसे नेता येईल याचाच विचार केला आहे. कुटुंबासाठी वेळ कमी देऊन राज्याच्या विकासासाठी वेळ दिला. महाराष्ट्रासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे असं सांगत चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे समर्थन केले आहे.

पंकजा मुंडेंनी आपल्या भाषणात जाहीर केले होते की फडणवीसांचे नेतृत्व मला मान्य नाही. यास बावनकुळेंनी उत्तर दिले असून सांगितले की पक्षासाठी देवेंद्र फडणवीसांनी खूप मोठे योगदान दिले आहे. तसेच २१ व्या शतकातील महाराष्ट्राला मजबूत करण्याची क्षमता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. ओबीसी, मराठा, धनगर हे बाजूला सारुन एकसंघ महाराष्ट्रासाठी काम केलं पाहिजे आणि भाजपातील सर्व नेते जात पात न बघता पक्षासाठी झटत आहेत. असेही त्यांनी पंकजांना सुनावले.

बावनकुळेंच्या आधी संजय काकडे यांनी देखील पंकजा मुंडेंवर टीका केली होती. काकडे म्हणाले की ५० पेक्षा अधिक भाजपा आमदार ओबीसी समाजाचे आहेत. पंकजा मुंडे यांचे काल जातीपातीचं राजकारण केलं आहे. ५ वर्ष सत्तेत असून मराठवाड्याच्या दुष्काळासाठी काय केलं? असा सवाल देखील उपस्थित करत गेल्या ५ वर्षात कोणत्या समाजातील कार्यकर्त्यांना पंकजा मुंडे यांनी सांभाळले आहे? अशी खोचक टीका देखील केली होती.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/