Real Estate in Pune | पुण्यात रियल इस्टेटला येणार सुगीचे दिवस; झानडू रियल्टीची प्रतिष्ठित नाईकनवरे डेव्हलपर्सशी भागीदारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Real Estate in Pune | पुण्यात सुरू असलेल्या तीन प्रकल्पांच्या पोर्टफोलियो साईन-अपसाठी झानडू रियल्टीने (Xanadu realty) नामवंत रियल इस्टेट डेव्हलपर नाईकनवरे डेव्हलपर्स (naiknavare developers) यांच्यासह भागीदारी केली आहे. एमएमआर आणि बंगळूर प्रांतात मजबूतपणे पाय रोवल्यावर झानडूने अलीकडेच पुणे रियल इस्टेट क्षेत्रात प्रवेश केला आहे (Real Estate in Pune).

या भागीदारीच्या कक्षेत असलेल्या तीन प्रकल्पांपैकी एक आहे तळेगांव येथील ‘नाईकनवरे निलय’, दुसरा आहे वडगांव मावळ येथील प्रीमियम प्लॉट, अपार्टमेंट, विला आणि बंगल्यांचा आलीशान प्रकल्प ‘ईगल्स नेस्ट’ आणि तिसरा आहे कृषी महाविद्यालयासमोरच्या मुख्य युनिव्हार्सिटी रोडवर असलेला लक्झरी बूटिक कमर्शियल जागा ऑफर करणारा ‘7 बिझनेस स्वेअर’ प्रकल्प.

मोक्याच्या ठिकाणी असलेला नाईकनवरे नीलय हा प्रकल्प तळेगाव रेल्वे स्टेशनपासून जवळ तसेच मुंबई-पुणे महामार्गावर आहे.
या गेटेड सोसायटीमध्ये 12-मजली तीन टॉवर्समध्ये मिळून 420 स्मार्ट डिझाइन असलेली अपार्टमेंट्स आणि 22 कमर्शियल सूट्स असून अत्यंत नेत्रसुखद असे डोंगर आणि तलावांचे व्ह्यू तेथून मिळतात.
तर, ईगल्स नेस्ट हे एका डोंगरावरील रिझर्व फॉरेस्टच्या जवळ आहे आणि टवटवीत हिरवळीने वेढलेले आहे.

7 बिझनेस स्क्वेअरच्या माध्यमातून नाईकनवरे डेव्हलपर्स आणि झानडू रियल्टी यांनी
शिवाजी नगर, या पुणे शहराच्या व्यावसायिक विभागात एक आरामदायक कमर्शियल संकुल आणले आहे.
शहरातील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या 7 बिझनेस स्क्वेअर या संकुलातून कृषी महाविद्यालयाचा हिरवागार परिसर दिसतो.
या संकुलात आहेत सुंदररित्या डिझाइन केलेली शोरूम्स आणि ऑफिसेस.

 

झानडू रियल्टीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विकास चतुर्वेदी म्हणाले, “पुण्यातील आमचे पहिले क्लायन्ट म्हणून नाईकनवरे डेव्हलपर्स यांच्याशी भागीदारी करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.
आम्ही अलीकडेच पुणे रियल इस्टेट बाजारपेठेत प्रवेश केला आहे आणि आम्हाला खात्रीने असे वाटते की, ही भागीदारी झानडू आणि नाईकनवरे दोघांसाठी फलदायी ठरेल.
या भागीदारीच्या माध्यमातून पुणे रियल इस्टेट मार्केटने दाखवलेल्या सकारात्मक कलाचा उपयोग करून घेण्याचे आमचे लक्ष्य आहे.
अगदी या महामारीच्या काळात देखील निवासी मालमत्तेची मागणी वाढताना दिसली.
त्यामुळे या तिन्ही प्रकल्पांत मागणी वाढवण्याकडे आमचे लक्ष असेल आणि आमच्या
या भागीदारीमुळे त्याचे अप्रतिम परिणाम मिळू शकतील.”

 

Web Title : real estate in Pune; Xanadu Realty partnered with naiknavare developers pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Indian Oil | इंडियन ऑईलची जबरदस्त ऑफर ! ‘डिझेल भरा, बक्षिसं जिंका’ ऑफरमधून 2 कोटी जिंकण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या ऑफर

High Blood Pressure | उच्च रक्तदाबाचा त्रास असणार्‍या रुग्णांसाठी ‘या’ गोष्टी फार महत्वाच्या; डॉक्टरांनी सांगितले फायदे

Indian players । भारतीय संघाचे खेळाडू यजुर्वेंद्र चहल, कृष्णप्पा गौथम यांना करोनाची लागण