सासूच्या कानातले हिसकावून घेताना कान ‘फाटला’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – म्हाताऱ्यांना आता काय करायचे दागिने, म्हसणात घेऊन जाणार आहे का दागिने अशी सरबत्ती करुन अनेक सुनांचा सासुसासऱ्यांच्या दागिन्यावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करीत असतात. चाकण येथील दावडमळामध्ये सुनेने त्याच्या पुढे जाऊन आपल्या सासूच्या कानातील सोन्याची फुले हिसकावुन घेताना झालेल्या झटापटीत सासूचा कान फाटला.

याप्रकरणी सिंधु सुदाम गोरे (वय ५५, रा़ संत सावतामाळीनगर, दावडमळा, चाकण) यांनी चाकण पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी त्यांचा मुलगा व सून यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सागर सुदाम गोरे आणि माधुरी सागर गोरे (रा़ संत सावतामाळीनगर, दावडमळा, चाकण) अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, सिंधु व सुदाम गोरे हे २८ ऑक्टोबरला दुपारी साडेबारा वाजता घरात गप्पा मारत बसले होते. त्यावेळी त्यांचा मुलगा सागर व सुन माधुरी यांनी दरवाजावर लाथा मारुन दरवाजा तोडला व आत प्रवेश केला. माझ्या लाईटीच्या माळा का घेऊन गेला असे म्हणून त्यांनी दोघांना शिवीगाळ केली. माधुरी हिने तुम्ही कानात घातलेले सोन्याचे फुल माझे आहे.

थेरडे तुला त्याची काही गरज नाही, असे म्हणून त्यांच्या कानाशी झोंबाझोंबी करु लागली. माधुरी हिने त्यांच्या उजव्या कानातील जोरात ओढल्याने कान फाटून त्यातून रक्त आले. या झोंबाझोंबीमध्ये कानातील फुल पडून गहाळ झाले. त्यात तिने सासूच्या उजव्या हाताचा चावा घेतला. त्यांना मारहाण करुन तुम्हाला बघून घेतो, असे म्हणून ते बाहेर गेले. बाहेर उभ्या असलेल्या त्याच्या दोन मोटारसायकल व टेम्पोवर दगड मारुन नुकसान केले.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like