सावधान ! तुमच्याकडे ‘या’ वर्षाच्या पुर्वीची कार – दुचाकी असेल तर ती लवकरच भंगारात जमा होणार, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या जुन्या वाहनांना न वापरण्याच्या प्रस्तावाला मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहे. जर याला मंजुरी मिळाली तर 2005 च्या आधीच्या वाहनांना पुन्हा रजिस्ट्रेशन आणि वाहनांसाठी पुन्हा नोंदणी आणि तपासणी करणे महागात पडणार आहे.

कॅबिनेट सूचनेला मंजुरी
सरकारच्या या धोरणामुळे जुन्या वाहनांची पुन्हा नोंदणी करणे खर्चिक असणार आहे. कारण नवीन वाहनांच्या मानाने जुन्या गाड्या 10 से 25 % जास्त प्रदूषण करतात. परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले होते की कॅबिनेटने दिलेल्या सूचनांना मंजुरी देण्यात आली होती.

प्रत्येक वर्षी फिटनेस सर्टिफिकेट महत्वाचे
मिळलेल्या माहितीनुसार खाजगी वाहनांना रजिस्ट्रेशन चार्जेस वाढवण्यासोबत ट्रान्सपोर्ट वाहनांना फिटनेस सर्टिफिकेट शुल्कामध्ये सुद्धा वाढ करण्यात आली आहे. याप्रमाणे असे अनेक नियम यामध्ये असू शकतात ज्याप्रमाणे ट्रान्सपोर्ट वाहनांना प्रत्येक वर्षी फिटनेस सर्टिफिकेशन आवश्यक करण्यात येईल.

वाहनांचा डेटाबेस सुद्धा बनणार
या नव्या नियमानुसार वाहनांतील एअरबॅग्ज सोबत सायलेन्सर मधील गोष्टींचा इको फ्रेंडली पद्धतीने विल्हेवाट लावली जाईल. तसेच गाडीतून निघालेल्या ऑइल ला जमिनीत न टाकता त्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली जाईल. तसेच कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी सर्व वाहनांचा डेटाबेस ठेवला जाणार आहे.

Visit : policenama.com