Early Bird Benefit Scheme | महाराष्ट्र सरकारने 31 मार्चपर्यंत वाढवली ‘अर्ली बर्ड बेनिफिट योजना’, ‘या’ वाहनांवर मिळतोय लाभ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) निवडक इलेक्ट्रिकल वाहनांवर खरेदीसाठी अर्ली बर्ड बेनिफिट योजना (Early Bird Benefit Scheme) 31 मार्च 2022 पर्यंत वाढवली आहे. ही येाजना अगोदर 31 डिसेंबर 2021 ला बंद होणार होती. 4-व्हीलरमध्ये केवळ दोन मॉडल, टाटाची नेक्सॉन ईव्ही आणि टिगोर ईव्ही (Tata Nexon EV and Tigor EV), या बेनिफिटसाठी पात्र आहे. (Early Bird Benefit Scheme)

महाराष्ट्र सरकारची ईव्ही पॉलिसी, वाहनांच्या बॅटरी क्षमतेसाठी 5000 रूपये प्रति केडब्ल्यूएचचे बेसिक इन्सेटिव्ह देते, ज्यामध्ये कमाल इन्सेटिव्ह 1.50 लाख रूपयांपर्यंत होऊ शकतो. अगोदर या पॉलिसी अंतर्गत ईव्ही खरेदीदारांना 31 डिसेंबर 2021 च्या अगोदर व्हेकल खरेदी केल्यास अर्ली बर्ड इन्सेटिव्हचा लाभ मिळू शकत होता, जो आता 31 मार्च 2022 पर्यंत वाढवला आहे.

नेक्सॉन ईव्ही क्वालिफाईंग व्हेरिएंटच्या खरेदीदारांना 2.5 लाख रुपयांची सूट मिळते, सबसिडी म्हणून 1.5 लाख रूपये आणि अर्ली बर्ड इन्सेटिव्हसाठी 1 लाख रुपये, यासोबतच टिगोर इव्हीचे सर्व व्हेरिएंट सबसिडीसाठी पात्र आहेत. आता एक्स्ट्रा अर्ली बर्ड बेनिफिट सोबत विकले जात आहे. (Early Bird Benefit Scheme)

काही महिन्यांपूर्वी ही माहिती समोर आली होती की, मोठ्या संख्येत खरेदीदार नेक्सॉनच्या क्वालीफाईंग व्हेरिएंटमध्ये शिफ्ट होत आहेत आणि सबसिडीचा लाभ घेण्यासाठी अनेक नवीन बुकिंग येत आहेत. मात्र, पॉलिसी लागू होण्यास उशीर, ग्लोबली सेमीकंडक्टरची कमतरता आणि कोविड-19 मुळे एका मोठ्या ऑर्डरचा बॅकलॉग झाला.

वेटिंग पीरियड बाबत बोलायचे तर नेक्सॉन ईव्ही क्वालिफाईंग व्हेरिएंट अव्हॅबिलिटीच्या बेसवर जवळपास सहा महिन्यात डिलिव्हरी केली जाऊ शकते.
तर टिगोर ईव्हीचा वेटिंग पीरियड जवळपास दोन महिन्यांचा आहे.

 

 

Web Title :- Early Bird Benefit Scheme | maharashtra government extended the early bird benefit scheme till march 31 2022

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात 76 वर्षीय आईला मेडिसीनचा ओव्हरडोस दिल्यानंतर ‘फाशी’ देऊन खून, 42 वर्षीय ‘इंजिनिअर’ गणेश फरताडेची धनकवडी परिसरात आत्महत्या; प्रचंड खळबळ

 

Dry Fruits-Immunity | हिवाळ्यात इम्युनिटी वाढवतील ‘हे’ ड्रायफ्रूट्स, सकाळी रिकाम्यापोटी खाल्ल्याने दूर होऊ शकतात अनेक आजार

 

Morning Habits-Weight Loss | सकाळी उठताच केली ‘ही’ 5 कामे तर फटाफट कमी होईल वजन, ‘या’ चूका वाढवू शकतात लठ्ठपणा

 

Hallmarking | आता वडिलोपार्जित दागिन्यांवरही असेल शुद्धतेचा शिक्का, जाणून घ्या किती आहे जुन्या सोन्याचे हॉलमार्किंग शुल्क