रक्ताच्या कमतरतेची ‘लक्षणं’, ‘कारणं’ अन् ‘उपाय’ ! दुलर्क्ष करणं पडू शकतं महागात

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे (NFHS) च्या एका रिपोर्टनुसार, भारतात 58.6 टक्के मुलं, 53.2 टक्के मुली आणि 50.4 टक्के गर्भवती महिला रक्ताची कमतरता म्हणजे एनिमिया या गंभीर आजाराला बळी पडतात. एनिमिया एक अशी स्थिती आहे ज्यात पीडित व्यक्तीच्या शरीरात रेड ब्लड सेल्स काऊंट कमी होतो किंवा हिमोग्लोबिन लेव्हल कमी होते. रक्ताच्या माध्यमातून शरीरात सगळ्या अवयवांना ऑक्सिजन पाठवला जातो. परंतु शरीरातील हिमोग्लोबिन लेव्हल कमी झाल्यामुळं ऑक्सिजन शरीरात नीट पाहोचत नाही. महिलांसाठी सामान्य हिमोग्लोबिन 12 ग्रॅम प्रति डेसीलिटर व पुरुषांमध्ये 13 ग्रॅम असतं.

रक्ताच्या कमतरतेमुळं दिसतात ही लक्षणं

– शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळं जास्त थकवा जाणवतो.
– हृदयाच्या ठोक्यात वाढ होते.
– श्वास घेण्यास त्रास होतो.
– डोकेदुखी
– लक्ष न लागणं
– चक्कर येणं
– त्वचा पिवळी पडणं
– पाय दुखणं
– अल्सर
– गॅस्ट्रीटिस
– बद्धकोष्ठता
– विष्ठेतून रक्त येणं

जर तुम्हाला अशी लक्षणं जाणवली तर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा.

तरुण मुलींमध्ये रक्ताच्या कमतरतेची कारणं

–  तरुण मुलांच्या तुलनेत मुलींमध्ये एनिमियाचा धोका जास्त असतो. याची अनेक कारणं आहेत. पहिलं आणि महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे महिलांना येणारी मासिक पाळी.

–  अनियमित जीवनशैली

–  आहार व्यवस्थित नसतं

–  अनेक मुली आयर्न असणारे पदार्थ जसे की, मांस, अंडी, कडधान्य खाणं टाळतात.

रक्ताच्या कमतरतेपासून बचाव करण्यासाठी कोणते पदार्थ खावेत ?

तुम्हाला असे पदार्थ खाण्याची गरज आहे ज्यामुळं तुम्हाला आयर्न भरपूर प्रमाणात मिळेल. यात मांस, अंडी, ड्रायफ्रूट्स, मनुके, हिरव्या पालेभाज्या, धान्य, गहू, वाटाणे असे पदार्थ असतील.

1) टोमॅटो – टोमॅटोचं सेवन केलं तर शरीरातील रक्ताची पातळी वाढते. पचनक्रिया चांगली राहण्यासाठीही याचा फायदा होतो. यात त्वचेसाठी आवश्यक अनेक पोषक घटक असतात. तुम्ही सॅलडमध्ये याचा समावेश करू शकता. परंतु ज्या लोकांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांनी टोमॅटोचं अधिक प्रमाणात सेवन करणं टाळायला हवं.

2) मनुके – मनुका आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. याचं सेवन करताना सर्वात आधी कोमट पाण्यात धुवून घ्या, नंतर दुधात उकळून घ्या. आता हे दुध प्या आणि त्यावर मनुके खा. जर दिवसातून दोन वेळा अशा प्रकारे मनुक्याचं सेवन केलं तर यानं खूप फायदा मिळेल. यानं थकवा दूर होऊन शरीरातील रक्ताची पातळी वााढण्यास मदत होते.

3) पालक – जर तुम्हाला शरीरातील रक्ताची पातळी दूर करायची असेल तर आहारात पालकचा समावेश नक्की करा. जर शरीराचं कार्य सुरू ठेवायचं असेल तर रक्ताची पातळी योग्य प्रमाणात असणं आवश्यक आहे. पालकमध्ये आयर्न भरपूर प्रमाणात असतं. हा याचा मुख्य स्त्रोत आहे. जर नियमितपणे आहारात याचा समावेश केला तर रक्ताची कमतरता दूर होते आणि मानसिक तणावही दूर होतो.

4) केळी – केळीत शरीराला आवश्यक असणारी अनेक पोषक तत्वे असतात. शरीरात ताकद आणि चरबी दोन्ही वाढवण्यासाठी याचा फायदा होतो. आहारात केळीचा समावेश केल्यास रक्ताची कमतरता दूर होते.

5) अंजीर – 1 दिवसात जर 1 कप अंजीर खाल्ले तर शरीराला जवळपास 240 मिलीग्रॅम कॅल्शियम मिळतं. याशिवाय यात फायबर, व्हिटॅमिन के आणि पोटॅशियम देखील असतं. दरोरोज उपाशीपोटी अंजीर खाल्लं तर बद्धकोष्ठता आणि पचनासंबंधित समस्या दूर होण्यास मदत होते.

6) आवळा – आवळ्यात व्हिटॅमिन सी, अँटी ऑक्सिडंट आणि अँटी इंफ्लेमेटरी तत्व असतात जे शरीराचं तारूण्य टिकवून ठेवण्यासाठी मदत करतात. तसंच यामुळं त्वचेचं आणि केसाचं सौंदर्यदेखील वाढतं.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.