‘सोरायसिस’ होण्यापुर्वी शरीरामध्ये ‘हे’ बदल होतात, जाणून घ्या लक्षणं अन् उपाय

पोलीसनामा ऑनलाइन – जगात १२.५० कोटी लोकांपेक्षा अधिक जणांना सोरायसिसची बाधा झाल्याचं दिसून येत. लोकांच्या जीवनावर याच्या होणाऱ्या परिणामांबाबत जागरुकता वाढवणे आणि रोगाविषयी अधिक माहिती देण्यासाठी जगभरात २९ ऑक्टोबर हा दिवस प्रत्येक वर्षी जागतिक सोरायसिस दिन साजरा करण्यात येतो. सोरायसिस हा सामायिक, आनुवंशिक, जुना आणि दाहक असा रोग आहे. यावर योग्य वेळी उपाय नाही केले तर अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

सोरायसिसच्या सामान्य लक्षणात संसर्ग झालेल्या काही भागात खाज येते, त्वचेवर पांढरे चट्टे दिसू लागतात. तसेच शरीरावर लाल डाग आणि चट्टे येतात. सतत होणाऱ्या खाजेमुळे त्वचा लाल होते आणि त्यावर जखमा होतात. यावरती कोणताही उपाय नसून, लक्षणांना कंट्रोल करणे शक्य असते. सोरायसिसमध्ये त्वचेच्या पेशीं त्वचेवर वेगाने वाढतात आणि हळूहळू स्केलिंग होतं. स्केल साधरणतः हाताच्या कोपऱ्यांवर आणि गुडघ्यांवर विकसित होते. त्याव्यतिरिक्त हात, पायांचा पंजा, मान आणि चेहऱ्यावर होतो. अनेक प्रकारच्या असे दिसून आलं की सोरायसिस नखे, तोंड यांच्या आजुबजुचा क्षेत्रात प्रभावित होतो. तर आज आम्ही तुम्हाला सोरायसिसची लक्षणे आणि उपाय सांगणार आहोत.

लक्षणे –
प्रत्येकात सोरायसिसची लक्षणे वेगवेगळी असतात आणि ते सोरायसिसच्या प्रकारावर ठरते. सोरायसिसचे निशाण कोपरावर लहान असतात. अनेकवेळा हे चट्टे शरीराचा जास्तीत जास्त भाग व्यापतात. त्वचा लाल होणे, त्यावर चट्टे पडणे, जळजळ होणे, नख जाड होणे, सांधे दुखणे ही सोरायसिसची लक्षणे आहेत.

सोरायसिसपासून बचावासाठी हे पदार्थ खा –

१. ताक : आयुर्वेदानुसार, सोरायसिस हा आजरा उद्भवल्यावर आहारात ताकाचा समावेश करणं फायदेशीर असते. त्यामुळे त्वचा आणि केस हेल्दी राहतात.

२. कडुलिंब : सोरायसिस वर उपचार म्हणून कडुलिंबाची पाने अत्यंत फायदेशीर ठरतात. कडुलिंबाच्या तेलात पोषक तत्वे मुबलक प्रमाणात असतात. यामुळे ते सोरायसिस आणि पिंपल्सवर उपचार करण्यास मदत करते.

३. सूर्यफुलाच्या बिया : सूर्यफुलाच्या बियांत असणाऱ्या पोषक तत्वामुळे शरीरावरील सूज कमी करण्यास मदत होते. जसे ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड. त्याचसोबत त्यामध्ये अँटी- ऑक्सिडंट असतात. हार्मोन्स सिक्रीशन बॅलेन्स करण्यासाठी मदत करतात.

४. अँटी इंफ्लेमेटरी पदार्थ : चेरी, सार्डिन, मासे, जांभूळ आणि मसाले ड्रायफ्रूट्स या पदार्थांचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

५. विषारी तत्वे निर्माण करणारे पदार्थ टाळा : आयुर्वेदानुसार, काही असे पदार्थ ज्यांच्या सेवनाने शरीरामध्ये विषारी तत्व तयार होतात. त्यांचं सेवन करणं टाळणं फायदेशीर ठरतं. जसं, मिल्कशेक आणि दही चुकूनही एकत्र खाऊ नका.

( टिप : यातील कोणतेही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांनाच सल्ला जरुर घ्या )

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like