खुशखबर ! मोदी सरकारची ‘ही’ योजना शेतकर्‍यांसाठी खुपच फायद्याची, अशाप्रकारे शेती करून कमवा लाखो रूपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. आता शेतकरी बांबूची शेती करुन लाखो रुपयांची कमाई करु शकतात. तर आता बांबू कापण्यासाठी फॉरेस्ट एक्ट देखील लागू होणार नाही, याआधी काँग्रेस सरकारने बाम्बू कापल्यास जंगल कायदा लावला होता. बाम्बू कापल्यास एफआयआर दाखल होत होती. आता तो कायदा शिथिल करण्यात आला आहे. त्यामुळे आता सरकारच्या कोणत्याही अडथळ्या शिवाय बाम्बूची शेती करु शकता आणि लाखो रुपये कमावू शकतात.

बाम्बूच्या शेतीसाठी सरकारी मदत –

बाम्बूच्या शेतीकडे व्यापारिक पद्धतीने पाहण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आणि त्यासाठी राष्ट्रीय बाम्बू मिशन राबवण्यात येणार आहे. एवढेच नाही तर बाम्बूच्या प्रति रोपट्यामागे 120 रुपये सरकारी मदत मिळेल. सरकारचा प्रयत्न आहे की शेतकऱ्यांनी बांबूची शेती करुन आधिक लाभ कमवावा.

मोदी सरकारच्या या योजनेबद्दल माहिती देताना कृषि मंत्रालयाचे एडिशनल सेक्रेटरी अल्का भार्गव यांनी सांगितले की, सरकार बांबूच्या शेतीला मिशनच्या पद्धतीने पुढे नेत आहे. त्यासाठीच बाम्बू मिशन बनवण्यात आले आहे. प्रत्येक राज्याला एक मिशन डायरेक्टर असेल. ज्यांची नेमणूक जिल्हांआधारे अधिकारी नेमतील. यात एग्रीकल्चर, फॉरेस्ट आणि इंडस्ट्री या तीनही विभागांचा समावेश असेल. इंडस्ट्री बांबूच्या प्रोडक्ट बद्दलच्या मार्केटची माहिती देईल.

जानेवारी 2018 मध्ये केंद्र सरकारने बाम्बूची झाडे कापण्याचा कायदा काढून टाकला आहे. आता खासगी जमिनींसाठी हा कायदा लागू नसेल. खासगी जमिनीत बांबू लावून तो कापण्याची मूभा आहे. मात्र फॉरेस्टमधील बांबू कापण्यास परवानगी नाही. तेथे कायदा लागू असेल.

किती आहे उत्पन्न –

गरजेनुसार आणि प्रजातीच्या हिशोबाने एक हेक्टर मध्ये 1500 ते 2500 रोपे लावू शकतात, जर तुम्ही 3 पट आधिक रोपे लावली तर एका हेक्टरमध्ये एकून 1500 झाडे लावता येतील. एवढेच नाही तर तुम्ही दोन झाडांच्या मध्ये दुसऱ्या पिकांचे उत्पादन घेऊ शकता. 4 वर्षांनंतर 3 ते 3.5 लाख रुपये कमाई होऊ शकते. दरवर्षी नवी लागवड करण्याची गरज नाही. कारण बांबूचे आयुष्य 40 साल पर्यंत असते.

सिने जगत –

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन